शिवसेनेच्या या आमदाराची टोल मॅनेजरला धमकी; अश्लील शिविगाळ केल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?
आमदार, खासदाराला काही समजत नाही का. असा सज्जड दम या आमदाराने दिला आहे. दोन दिवसांपूर्वी मुलगा आला होता. त्याची तक्रार का केली. अशा प्रश्नांची सरबत्ती या आमदाराने केली.
बुलढाणा : एका आमदाराचे व्हिडीओ व्हायरल झालेत. या व्हिडीओत आमदार एका टोल मॅनेजरला चांगलेच खडसावत आहेत. एका कामगाराला कामावरून का काढलं. यावरून हे आमदार चांगलेच आक्रमक झालेत. त्यांनी थेट टोल प्लाझा गाठला. त्यानंतर मॅनेजरला अश्लिल शब्दात शिविगाळ केली. तू कुठला आहेस. जिथून आलास तिथं परत पाठविणं. टोल प्लाझा बंद करेन. आमदार, खासदाराला काही समजत नाही का. असा सज्जड दम या आमदाराने दिला आहे. दोन दिवसांपूर्वी मुलगा आला होता. त्याची तक्रार का केली. अशा प्रश्नांची सरबत्ती या आमदाराने केली.
कर्मचाऱ्याला कामावरून का काढले?
शिवसेनेचे आमदार संजय रायमुलकर यांचा समृद्धी टोल प्लाझावर राडा दिसून आला. टोल कर्मचाऱ्याला कामावरून का काढून टाकलं, असा जाब संजय रायमुलकर यांनी मॅनेजरला विचारला. संजय रायमुलकर यांनी टोल नाक्यावरील मॅनेजरला धमकावल्याचा आरोप आहे. तसेच मॅनेजरला शिविगाळ केल्याचाही आरोप केला जातोय. दोन दिवसांपूर्वीच रायमुलकर यांच्या मुलानं टोल प्लाझावरील मॅनेजरला मारहाण केली होती. त्याची तक्रार का केली, असा जाबही रायमुलकर यांनी विचारला.
तो पुरा तोडफोड करूंगा
शिवसेनेच्या आमदाराने समृद्धी टोल प्लाझावर राडा घातला. मॅनेजरला धमकी दिली. समृद्धी महामार्गावरील टोल कर्मचाऱ्याला कामावरून काढून टाकल्याच्या राग आमदाराला आला. शिवसेनेच्या मेहकर येथील आमदार संजय रायमुलकर यांनी टोल मॅनेजरला अर्वाच्च तसेच अश्लील शिवीगाळ केली. लडके को काम पे नहीं लिया तो पुरा तोडफोड करूंगा. आमदार संजय रायमुलकर यांनी टोल मॅनेजर अशी धमकी दिली.
टोल मॅनेजरला शिविगाळ
दोन दिवसांपूर्वी समृद्धीच्या मेहकर टोल प्लाझावरील पवन कुमार या मॅनेजरला रायमुलकर यांच्या मुलाने आणि एका शासकीय कर्मचाऱ्याने याच कारणावरून मारहाण केली होती. काल सायंकाळी आमदार रायमुलकर यांनी कार्यकर्त्यांना घेऊन समृद्धी टोल प्लाझावर गेले. टोल मॅनेजरला अश्लील शिवीगाळ करत टोल तोडण्याची धमकी दिली. या प्रकरणी अद्यापही पोलिसांत तक्रार नाही.