AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुलीला मेसेज का केला म्हणून वाद, वाद सोडवणारा अडकला; त्यानंतर घडली ही धक्कादायक घटना

दोन कुटुंबीयांमध्ये वाद झाला. वादाचे कारण होते आमच्या मुलीला मेसेज का पाठवले. या वरून हा वाद सुरू झाला. जाब विचारत असताना एक जण मधात पडला. त्याला मध्यस्ती करणे चांगलेच भोवले.

मुलीला मेसेज का केला म्हणून वाद, वाद सोडवणारा अडकला; त्यानंतर घडली ही धक्कादायक घटना
Follow us
| Updated on: Mar 26, 2023 | 7:36 AM

बुलढाणा : कधी कोणाच्या कसा जीव जाईल काही सांगता येत नाही. समाजात वाद हे होत असतात. त्या वादाचे दुष्परिणाम खूप वाईट होतात. छोट्याछोट्या कारणावरून झालेले वाद विकोपाला जातात. याचा शेवट अतिशय वाईट होतो. अशीच एक घटना बुलढाणा जिल्ह्यातल्या लोणार येथे घडली. दोन कुटुंबीयांमध्ये वाद झाला. वादाचे कारण होते आमच्या मुलीला मेसेज का पाठवले. या वरून हा वाद सुरू झाला. जाब विचारत असताना एक जण मधात पडला. त्याला मध्यस्ती करणे चांगलेच भोवले.

ही घटना आहे भुमराळा येथील. एका कुटुंबीयांकडून दुसऱ्या कुटुंबीयांकडे मेसेज गेला. तो मेसेज मुलीला पाठवण्यात आला होता. मुलीने तो घरच्या लोकांना सांगितला. घरचे लोक चिडले. त्यांनी याचा जाब विचारायचे ठरवले. त्यासाठी ते नातेवाईकांकडे गेले. त्यावेळी दोन कुटुंबीयांमध्ये वाद झाला. हा वाद सुटावा असा प्रयत्न करणारे भानुदास चव्हाण यात बळी गेले.

हे सुद्धा वाचा

दोन कुटुंबीयामधील वाद

या वादात दोन कुटुंबीयांमध्ये चांगलीच हाणामारी झाली. यात वाद सोडवण्याचा प्रयत्न करणारे भानुदास चव्हाण यांनाही मारहाण करण्यात आली. यात त्यांचा जीव गेला. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. चार आरोपींना अटक केली आहे.

लोणार तालुक्यातील भुमराळा येथील गणेश चव्हाण यांच्याकडे जालना जिल्ह्यातील त्यांचेच नातेवाईकांनी गेले. आमच्या मुलीला मोबाईलवर मेसेज का केला म्हणून जाब विचारला. यावेळी या दोन कुटुंबात जाब विचारण्यावरून जोरदार हाणामारी सुरू झाली.

हा वाद सोडवायला गेलेल्या भानुदास चव्हाण यांनाही मारहाण झाली. 50 वर्षीय भानुदास चव्हाण यात त्यांचा मृत्यू झाला. बिबी पोलिसांनी याप्रकरणी जालना येथील चार आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल केला. या चारही आरोपींना अटक केली.

मध्यस्थी करणारा व्यक्ती हा समजूतदार होता. पण, त्यांचा समजूतदारपणा काही चालला नाही. रागाच्या भरात आरोपींनी त्यांना मारहाण केली. यात त्यांचा मृत्यू झाला. आता पोलिसांना आरोपींना अटक केली आहे. त्यांना रागाची किंमती चुकवावी लागणार आहे.