Buldana Accident | खामगावजवळ दुचाकी अपघातात एक ठार, एक गंभीर; पोलिसांना येण्यास उशीर, अर्धा तास रास्तारोको

बुलडाणा जिल्ह्यातील खामगावजवळ दुचाकी अपघातात एक ठार, एक गंभीर जखमी झाला. घटनेनंतर पोलिसांना कळविण्यात आले. पण, पोलीस उशिरा आल्यानं संतप्त नागिराकांनी रास्तारोको आंदोलन केले. त्यामुळं सुमारे अर्धा तास वाहतूक विस्कळीत झाली होती.

Buldana Accident | खामगावजवळ दुचाकी अपघातात एक ठार, एक गंभीर; पोलिसांना येण्यास उशीर, अर्धा तास रास्तारोको
खामगावजवळील अपघातानंतर दुचाकी अशी पडून होती. Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Apr 15, 2022 | 12:19 PM

बुलडाणा : दुचाकीचा भीषण अपघात होऊन एक जण जागीच ठार झाला तर एकजण गंभीररित्या जखमी झाला. ही घटना नागपूर- मुंबई या राष्ट्रीय महामार्गावरील खामगाव शहराजवळ घडलीय. यावेळी पोलीस (Police) घटनास्थळी लवकर पोहचले नाही. म्हणून नागरिकांनी काही काळ रास्तारोको (Rastaroko) केला होता. यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. खामगाव तालुक्यातील लोखंडा-पाळा येथील दोघे दुचाकीने जात होते. राष्ट्रीय महामार्ग (Highway) क्रमांक 6 वरील मोठ्या हनुमान मंदिराजवळ त्यांच्या दुचाकीला भीषण अपघात झाला. यात दुचाकीवरील गजानन श्रीपाद वानखेडे हे जागीच ठार झाले. पुंजाजी आनंद पवार हा गंभीररित्या जखमी झाला.

पोलिसांना येण्यास उशीर

जखमीला नागरिकांनी उपचारासाठी खामगाव येथील सामान्य रुग्णालयात भरती केले. या अपघातामुळे बराच वेळ महामार्गावरील वाहतूक खोळबंली होती. घटनास्थळी पोलीस उशिरा पोहचल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी अर्धातास रास्तारोको केला. यामुळे देखील वाहतूक ठप्प झाली होती. वाहतूक खोळंबली असताना पोलीस कुठे गेले होते, असा प्रश्न उपस्थित करण्यात आलाय. एरवी दुचाकी अडवून त्यांच्याकडून वसुली करण्यात वाहतूक पोलीस तत्पर असतात. अपघात झाल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्याची जबाबदारी कुणाची असा सवाल संतप्त नागरिकांनी केला.

वाहतूक खोळंबली

बुलडाणा जिल्ह्यातील खामगावजवळ दुचाकी अपघातात एक ठार, एक गंभीर जखमी झाला. घटनेनंतर पोलिसांना कळविण्यात आले. पण, पोलीस उशिरा आल्यानं संतप्त नागिराकांनी रास्तारोको आंदोलन केले. त्यामुळं सुमारे अर्धा तास वाहतूक विस्कळीत झाली होती. शेवटी पोलीस पोहचले. रस्त्यावर दुचाकी पडली होती. मृतक बाजूलाच पडून होता. जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामुळं वाहतूक खोळंबली होती. याचा त्रास प्रवास करणाऱ्या नागरिकांना झाला. याचा रोष त्यांनी शेवटी पोलिसांवर काढला.

Sunil Mendhe | नाना पटोलेंचे कार्यकर्ते धान घोटाळ्यात सहभागी? भंडाऱ्याचे खासदार सुनील मेंढे यांचा गौप्यस्फोट, सीबीआय चौकशी होणार

Buldana | आमदार संजय कुटे यांचे शेगाव पोलिसांवर गंभीर आरोप; भाजप, विहिंप, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल का?

Video Navneet Rana | हनुमान जयंतीला हनुमान चालीसा पठण करणार, मंदिरावर भोंगे लावणार; खासदार नवनीत राणा यांचे वक्तव्य

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.