Buldana Accident | समृद्धी महामार्गावर टायर फुटल्याने जालनाजवळ अपघात, मेहकर येथील एक जण ठार तर दोन जण जखमी, कार चक्काचूर
अपघात झाल्यावर गाडीने अनेक पलटी मारली असावी. त्यामुळे गाडीचे पूर्णपणे नुकसान झालेय. गाडीतील जखमींवर जालना येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी अधिकृतपणे अद्यापही सुरू नाही. मात्र या मार्गावरून बिनधास्त वाहतूक सुरू आहे. यामुळेच असे अपघात होत आहेत. यापूर्वी सुद्धा या मार्गावर अपघात होऊन दोन जण ठार झाले आहेत.
बुलडाणा : समृद्धी महामार्गावर जालनाजवळ अपघात झाला. या अपघातात एक जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले. ही घटना काल सायंकाळी घडली. या अपघातामध्ये जानेफळ (Janephal) येथील सुनील निंबेकर, चंदू सावळे हे गंभीर जखमी झाले आहे. मेहकर येथील हॉटेल व्यवसायिक बळीराम खोकले (Baliram Khokle) यांचा मृत्यू झाला. अपघातातील व्यक्ती ह्या हुंदाई कारने (Hyundai car) जालनावरून मेहकरकडे येत होते. समृद्धी महामार्गावरून येत असताना कारचा टायर फुटल्यामुळे हा अपघात घडला, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.
जखमींवर जालना येथील रुग्णालयात उपचार
अपघात झाल्यावर गाडीने अनेक पलटी मारली असावी. त्यामुळे गाडीचे पूर्णपणे नुकसान झालेय. गाडीतील जखमींवर जालना येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी अधिकृतपणे अद्यापही सुरू नाही. मात्र या मार्गावरून बिनधास्त वाहतूक सुरू आहे. यामुळेच असे अपघात होत आहेत. यापूर्वी सुद्धा या मार्गावर अपघात होऊन दोन जण ठार झाले आहेत.
असा झाला अपघात
समृद्धी महामार्ग अद्याप जालना भागातून अधिकृत सुरू झाला नाही. तरीही या भागातून काही लोकं वाहतूक करतात. बळीराम खोकलेंसह सुनील निंबेकर व चंदू सावळे हे हुंदाई कारने मेहकरकडं येत होते. गाडीचा अचानक टायर फुटला. त्यामुळं गाडीने पलट्या मारल्या. यात गाडीतील दोन जण जखमी झाले. एक जण ठार झाला. हुंदाई कार चक्काचूर झाली.
जखमी रुग्णालयात दाखल
अपघातात एक जण ठार झाला. दुसरे दोन जण जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर आहे. गाडीचे नुकसान झाले आहे. जीवहानीही झाली. समुद्धी महामार्ग अधिकृत सुरू करणे आवश्यक आहे. परंतु, हा महामार्ग सुरू करण्याचा मुहूर्त अद्याप निघाला नाही. त्वरित हा महामार्ग सुरू करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.