…उत्तर मिळाले, पोलीस आमदारांच्या गाड्या धुणार; बुलडाण्याचे काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांच्या Video ने राज्यात एकच खळबळ
Harshvardhan Sapkal : काँग्रेसचे बुलडाण्याचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी एक व्हिडिओ समाज माध्यमांवर शेअर केला आहे. त्याचे पडसाद आता राज्यात उमटत आहेत. त्यात एक पोलिस स्थानिक आमदारांची कार धुताना दिसत आहे. राज्यात पोलिसांविरोधात सत्ताधारी आक्रमक झालेले असताना या प्रकाराची भर पडली आहे.
बुलडाण्याचे काँग्रेसचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी एक व्हिडिओ समाज माध्यमांवर शेअर केला आहे. त्यात एक पोलीस स्थानिक आमदारांची कार धुताना दिसत आहे. राज्यात सत्ताधारीच काही ठिकाणी पोलिसांवर अरेरावी करताना दिसत असताना आता या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यचे पडसाद लागलीच उमटले. विरोधकांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर या प्रकरानंतर पुन्हा हल्लाबोल केला. विरोधकांनी या प्रकरणात फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. काय आहे हे प्रकरण? काय आहे व्हिडिओत?
सपकाळ यांनी साधला निशाणा
काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी ट्विटरवर एक पोस्ट केली आहे. त्यात एक पोलीस स्थानिक आमदार संजय गायकवाड यांची कार धुत असल्याचा दावा करण्यात आला आहे. हा प्रकार आमदार महोदयांच्या घरासमोर घडल्याचा दावा करण्यात येत आहे. या व्हिडिओला ‘रामचंद्र कह गये सिया से’ हे भजन जोडण्यात आले आहे. त्यामाध्यमातून पोलिसांवर पण टीका करण्यात आली आहे. तर स्थानिक आमदारांवर पण सपकाळ यांनी निशाणा साधला आहे.
महाराष्ट्र पोलीस शर्म करो ! 2दिवसांपूर्वी आमदारांनी असंवेदनशील वक्तव्य केले होते CM शाळेत पहारा देणार आहेत का ? SP आरोपीच्या घरी बसणार आहेत का? याचे उत्तर आज सकाळी मिळाले पोलीस आमदारांच्या गाड्या धुणार! पोलीस यंत्रणेची चाटूगिरी सिद्ध.
कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा? pic.twitter.com/FnCXaXBaZp
— Harshwardhan Sapkal (@harshsapkal) August 29, 2024
आता उत्तर मिळाले का?
महाराष्ट्र पोलीस शर्म करो ! 2 दिवसांपूर्वी आमदारांनी असंवेदनशील वक्तव्य केले होते. CM शाळेत पहारा देणार आहेत का ? SP आरोपीच्या घरी बसणार आहेत का? याचे उत्तर आज सकाळी मिळाले पोलीस आमदारांच्या गाड्या धुणार! पोलीस यंत्रणेची चाटूगिरी सिद्ध. कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा? असे ट्वीट त्यांनी केले आहे. या व्हिडिओने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या
आमदार संजय गायकवाड यांची गाडी पोलीस धुताना दिसत आहेत. राज्यात काय सुरु आहे. आता तरी देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्या अशी मागणी शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे. विरोधकांना सत्ताधाऱ्यांकडून गेल्या काही दिवसांपासून आयते कोलीत मिळत असल्याने विरोधकांच्या टीकेला धार आली आहे. अनेक मुद्यांवर महायुती सरकारला घेरण्यासाठी विरोधकांना संधी मिळत असल्याचे चित्र आहे.