शिवसेना आमदाराचं सर्वात मोठं वक्तव्य, राष्ट्रवादीचा पालकमंत्री होऊ देण्यास थेट विरोध
शिवसेना आमदाराने राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराला आपल्या जिल्ह्याचा पालकमंत्री होऊ देणार नाही, असं थेट वक्तव्य केलं आहे. शिवसेना आमदाराच्या या वक्तव्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून काय प्रतिक्रिया येते ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.
बुलढाणा : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आता सत्तेत सहभागी होऊन 13 दिवस उलटले आहेत. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नव्या मंत्र्यासाठी खातेवाटपही जाहीर करण्यात आलं आहे. खातेवाटप जाहीर करताना विद्यमान मंत्र्यांकडीलही खात्यांची जबाबदारी नव्या मंत्र्यांकडे देण्यात आली आहे. खातेवाटपात बरेच बदल करण्यात आले आहेत. अजित पवार यांच्या गटाच्या मंत्र्यांना चांगली खाती मिळाली आहे. विशेष म्हणजे लवकरच आता मंत्रिमंडळाचा विस्तार होणार. राज्य विधी मंडळाच्या पावसाळी अधिवेशनानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. तसेच पालकमंत्र्यांची देखील घोषणा होणार आहे. यावेळी बरेच जिल्ह्यांचे पालकमंत्री बदलण्यात येणार असल्याची चर्चा आहे. याशिवाय सत्तेत सहभागी झालेल्या राष्ट्रवादी पक्षाला तब्बल 10 पालकमंत्रीपद मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. याबाबत शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूण 9 मंत्र्यांचा शपथविधी पार पडला आहे. या सर्व 9 मंत्र्यांसाठी खातेवाटपही जाहीर झालं आहे. तसेच आगामी काळात जो मंत्रिमंडळ विस्तार होईल त्यामध्ये राष्ट्रवादीच्या आणखी 2 मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या 10 मंत्र्यांना पालकमंत्रीपद मिळणार असेल आणि आणखी दोन मंत्रिपद शिल्लक असतील तर आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेंद्र शिंगणे यांना कदाचित संधी मिळू शकते.
राजेंद्र शिंगणे हे महाविकास आघाडी काळातही अन्न-औषध प्रशासनाचे मंत्री होते. त्यामुळे त्यांना मंत्रीपदाची संधी मिळाली तर कदाचित त्यांच्या बुलढाणा जिल्ह्याचं पालकमंत्रीपदही त्यांना मिळू शकतं. याचबाबत संजय गायकवाड यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली.
आमदार संजय गायकवाड नेमकं काय म्हणाले?
बुलढाणा जिल्ह्याचं पालकमंत्रीपद राष्ट्रवादीच्या मंत्र्याला मिळालं तर? असा प्रश्न संजय गायकवाड यांना पत्रकारांनी विचारला त्यावर त्यांनी “काही झालं तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना जिल्ह्याचा पालकमंत्री होऊ देणार नाही”, असं स्पष्ट मत संजय गायकवाड यांनी मांडलं.
“बुलढाणा जिल्ह्यात 2 शिवसेना आणि 3 भाजपचे आमदार आहेत. इथे आम्हाला बहुमत आहे. त्यामुळे जिल्ह्यात एक आमदार असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला पालकमंत्री पद मिळू देणार नाही”, अशी भूमिका संजय गायकवाड यांनी मांडली.
बुलढाणा जिल्ह्यातील पक्षीय बलाबल :
संजय गायकवाड, बुलढाणा (शिवसेना) संजय रायमूलकर, मेहकर (शिवसेना) डॉ. संजय कुटे, जळगाव जामोद (भाजप) आकाश फुंडकर, खामगाव (भाजप) श्वेता महाले, चिखली, (भाजप) राजेश एकडे, मलकापूर (काँग्रेस) राजेंद्र शिंगणे, सिंदखेड राडा (राष्ट्रवादी काँग्रेस