‘मी सुषमा अंधारेंना नाही, सती सावित्री सारख्या महिलांच्या आरोपांना उत्तर देतो’, संजय गायकवाड यांचं वक्तव्य

शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी सुषमा अंधारे यांच्या टीकेला उत्तर देताना खोचक प्रतिक्रिया दिली आहे. "सुषमा अंधारे सारख्या महिलेने जो आरोप केलाय त्यांना उत्तर देणार नाही. कारण मी सती सावित्री सारख्या महिलांनी आरोप केले तर उत्तर देतो", अशी खोचक प्रतिक्रिया संजय गायकवाड यांनी दिली आहे.

'मी सुषमा अंधारेंना नाही, सती सावित्री सारख्या महिलांच्या आरोपांना उत्तर देतो', संजय गायकवाड यांचं वक्तव्य
Follow us
| Updated on: Feb 05, 2024 | 2:51 PM

गणेश सोळंकी, Tv9 प्रतिनिधी, बुलढाणा | 5 जानेवारी 2024 : ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्यावर टीका केलेली. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजूरड्या आमदाराला लगाम लावावा”, असं वक्तव्य सुषमा अंधारे यांनी केलं होतं. त्यांच्या या टीकेबद्दल संजय गायकवाड यांना प्रश्न विचारला असता त्यांनी खोचक प्रतिक्रिया दिली. “सुषमा अंधारे सारख्या महिलेने जो आरोप केलाय त्यांना उत्तर देणार नाही. कारण मी सती सावित्री सारख्या महिलांनी आरोप केले तर उत्तर देतो. इतरांना देत नाही”, अशी प्रतिक्रिया संजय गायकवाड यांनी दिली. त्यांच्या या प्रतिक्रियेवर सुषमा अंधारे काय प्रत्युत्तर देतात ते पाहणं महत्त्वाचं ठरेल. संजय गायकवाड यांनी नुकतंच मंत्री छगन भुजबळ यांच्यावरही टीका केलेली. त्यांच्या टीकेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात संतापाची लाट पसरली होती. भुजबळ यांनी त्यांना त्यावर प्रत्युत्तरदेखील दिलं होतं. पण भुजबळांनी नाव्ही समाजाला मराठ्यांची हजामत करु नका, असं आवाहन केल्याने गायकवाड यांनी पुन्हा भुजबळांवर निशाणा साधला.

“छगन भुजबळ हे राज्यातले हे मोठे नेते आहेत. त्यांनी राज्यातल्या एकमेकांच्या समाजाबद्दल घाणेरडे आणि विषारी शब्द वापरून आग लावायचे प्रयत्न करू नये. आम्ही हे वारंवार सांगत आलोय. एव्हढ्या मोठ्या नेत्याबद्दल आरोप करायला आम्हालाही बरं वाटत नाही. किमान अशी भाषा त्यांनी यापुढे तरी बंद केली पाहिजे”, असं आवाहन संजय गायकवाड यांनी केलं आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणावरुन सरकारमध्ये गँगवार सुरु असल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या टीकेला संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिलं. “हे काही गँगवार वगैरे नाही. प्रॉपर्टी आणि दोन परिसरातला वाद आहे. दोघांच्या भांडणात विषय घडला”, असं संजय गायकवाड म्हणाले.

‘मुख्यमंत्री करण्यासाठी 145 आमदार पाहिजेत हे लक्षात ठेवा’

उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्रीपदाबाबतही भाषण केलं. नाकावर टिच्चून आमचा मुख्यमंत्री करू, असं उद्धव ठाकरे म्हणाले. त्यावर संजय गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली. “डोक्यावर टिच्चून करा की, नाकावर टिच्चून कारा. पण मुख्यमंत्री करण्यासाठी 145 आमदार पाहिजेत, हे लक्षात ठेवा आणि आपले किती येतील ते पहा”, असा टोला संजय गायकवाड यांनी लगावला.

‘युतीतल्या लोकांबरोबर काम करणे हे जर मोदीबिंदू दिसत असेल तर’

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोदीबिंदू झाला, अशी टीका केली होती. त्यावर संजय गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “आमच्या लोकांना युतीतल्या लोकांबरोबर काम करणे हे जर मोदीबिंदू दिसत असेल तर हे त्यांचे दुर्दैव. आमचे हे प्रेम आहे की, राज्यातल्या लोकांना त्याचा फायदा होतो. हे एकनाथ शिंदे यांचे कसब आहे. या राऊत्या फांवत्याला कधी कोणाशी संबंध ठेवताच आले नाही. हे फाटक्या तोंडाचे याला त्याला नाव ठेवतात. आता याचा कुणी मित्र पण राहिलेला नाही”, अशी टीका संजय गायकवाड यांनी केली.

‘एकनाथ शिंदे देणारा माणूस, घेणारा नाही’

संजय राऊत यांनी गणपत गायकवाड यांनी केलेल्या आरोपांवरुन एकनाथ शिंदे यांना अटक करा, अशी मागणी केली आहे. त्यावर संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिलं. “मग त्यांच्याकडे एव्हढे कोट्यवधी रुपये आले कुठून? याचा तपास व्हायला पाहिजे. एकनाथ शिंदे देणारा आहे, घेणारा माणूस नाही. याचा अनुभव प्रत्यक्ष आम्हाला आहे. कोणी उठले सुटले की आरोप करायचे. या लोकांना धंदा राहिला नाही. शिंदे यांची स्वच्छ प्रतिमा खराब करायचा या लोकांचा धंदा आहे”, असं संजय गायकवाड म्हणाले.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.