“आम्ही योग्य वेळी महाराष्ट्राच्या हिताची भूमिका घेऊ”; उद्धव ठाकरे यांच्यावर या नेत्याचा जोरदार पलटवार
महाराष्ट्र एकीकरण समितीचा बंदोबस्त करणारा अजून जन्माला आला नाही, याबाबत योग्य वेळी महाराष्ट्राच्या हिताची भूमिका घेऊ, मात्र उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना वेगळा चष्मा लागलेला आहे, त्यांना मुख्यमंत्री आणि 40 आमदारांशिवाय दुसरा काही विषयाचं राहिला नाही,
बुलढाणा : राज्यात सत्तांतर झाल्यापासून राजकीय वातावरण प्रचंड ढवळून निघाले आहे. ठाकरे गट आणि शिवसेनेकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यातच आता कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्याने राज्यातीला वातावरण आणखी तापले आहे. कर्नाटक निवडणुकीवरूनच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जहरी टीका केली होती. त्यावरूनच आमदार संजय गायकवाड यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे.
आमदार संजय गायकवाड यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना म्हणाले की, उद्धव ठाकरे, संजय राऊतांना मुख्यमंत्री आणि चाळीस आमदारांशिवाय दुसरं काही दिसत नाही.
राज्यातील सत्ता त्यांच्या हातातून गेल्यामुळे ठाकरे गटातील सर्व नेते आता बावचळले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून शिवसेनेवर आणि मुख्यमंत्र्यांवर टीका केली जात असल्याचा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.
कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून महाराष्ट्रातील राजकारणही ढवळून निघाले आहे. महाराष्ट्रातील नेत्यांकडून बेळगावमधील मराठी उमेदवारांसाठी प्रचार करताना महाराष्ट्र एकीकरण समितीचा बंदोबस्त करणारा अजून जन्माला आला नाही.
त्यामुळे आता योग्यवेळी महाराष्ट्राच्या हिताची भूमिका घेऊ असंही आमदार संजय गायकवाड यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कर्नाटक दौऱ्यावरून उद्धव ठाकरे यांनी टीका केली होता.
कर्नाटकाचे मुख्यमंत्री महाराष्ट्र एकीकरण समितीचा बंदोबस्त करण्याची भाषा करतात आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कानड्यांची भांडी घासायला जातात असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला होता. त्यांच्या या टीकेला उत्तर देताना संजय गायकवाड यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केला आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीचा बंदोबस्त करणारा अजून जन्माला आला नाही, याबाबत योग्य वेळी महाराष्ट्राच्या हिताची भूमिका घेऊ, मात्र उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना वेगळा चष्मा लागलेला आहे, त्यांना मुख्यमंत्री आणि 40 आमदारांशिवाय दुसरा काही विषयाचं राहिला नाही, त्यामुळे ते बावचळलेले आहेत, असा घणाघातही त्यांनी त्यांच्यावर केला आहे.
आमदार संजय गायकवाड यांनी शरद पवार यांच्यावरही जोरदार निशाणा साधला आहे. शरद पवारांनी निवृत्तीची खेळी ही आपल्या पक्षातील बंड शमविण्यासाठीच केली असल्याचं म्हणत त्यांनी राष्ट्रवादी बंड करण्याच्या तयारीत काही आमदार असल्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे.