Buldana Crime : विहिरीत सापडला महिलेचा मृतदेह, आत्महत्या नसून हत्या असल्याचा नातेवाईकांचा आरोप, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या
ही आत्महत्या नसून ही हत्या आहे. शुभांगीला मारून नंतर तिचे प्रेत विहिरीत टाकले असल्याचा आरोप शुभांगीच्या नातेवाईकांनी केला.
बुलडाणा : देऊळगाव (Deulgaon) राजा तालुक्यातील गारखेड (Garkhed) येथील विवाहितेचा मृतदेह गावाजवळ विहिरीत आढळला. या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी शिरपूर येथील शेकडो ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ठिय्या आंदोलन केले. दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केलीय. बुलडाणा तालुक्यातील शिरपूर (Shirpur) येथील शुभांगी शिंगणे हिचा विवाह सात वर्षाआधी गारखेड येथील नितीन शिंगणे सोबत झाला होता. एक सप्टेंबरच्या सकाळपासून शुभांगी बेपत्ता होती. नातेवाईकांनी तिचा शोध घेतला. परंतु ती मिळून आली नाही. त्यानंतर तीन सप्टेंबर रोजी तिचा मृतदेह गावाजवळच्या विहिरीतच आढळला.
गुन्हा आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा
याप्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात कौटुंबिक हिंसाचार आणि आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र ही आत्महत्या नसून ही हत्या आहे. शुभांगीला मारून नंतर तिचे प्रेत विहिरीत टाकले असल्याचा आरोप शुभांगीच्या नातेवाईकांनी केला. तिचा पती तसेच सासरच्या इतर मंडळी विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात यावी. त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी, या मागणीसाठी बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयात नातेवाईक तसेच ग्रामस्थांनी काही वेळ ठिय्या दिला. अशी माहिती नातेवाईक नितेश थिगले यांनी दिला. या प्रकरणी पोलीस काय कारवाई करतात, हे पाहावं लागेल. पोलिसांनी विवाहित मृत महिलेच्या पतीची व सासरकडच्या लोकांची चौकशी करणे सुरू केले आहे. त्यानंतर योग्य तो निर्णय घेतील. परंतु, विवाहितेचे नातेवाईक अतिशय आक्रमक झाले होते. त्यामुळं त्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच आंदोलन केले.