Buldhana Murder : बुलढाण्यात रामकृष्ण आश्रमात तरुणाचा जळालेल्या अवस्थेत आढळला मृतदेह, घातपाताचा संशय
पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे वरुण शेख रहिश या कामगार मजुराला संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे. मजूर शेख रईस याने चिखली येथून मृतकाला कामावर नेले होते. तीन ते चार दिवस मृतकाचे त्याठिकाणी कामही केले. मात्र आज सकाळी जळालेला मृतदेह आढळला आरोपीच्या चौकशीनंतरच यातील सत्य समोर येईल.
बुलढाणा : बुलडाणा जिल्ह्यातील अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या गांगलगाव येथे एका अनोळखी तरुणाचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह (Deadbody) आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी घातपाताचा संशय व्यक्त करण्यात येत असून, पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गांगलगाव येथे गावापासून काही हाकेच्या अंतरावर रामकृष्ण आश्रम (Ramkrishna Ashram) आहे. या आश्रमाचे सध्या बांधकाम सुरू आहे. याच आश्रमात आज सकाळी अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करत कामावरील एका मजुराला चौकशीसाठी ताब्यात (Detained) घेतले आहे. पुढील तपास अंढेरा पोलीस करत आहेत. मात्र हा घातपाताचा संशय असून तपासानंतरच सत्य समोर येईल.
गुप्त माहितीच्या आधारे संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात
शिवाजी बोबडे असे मयत तरुणाचे नाव आहे. तर वरुण शेख रहिश असे संशयित आरोपीचे नाव आहे. रामकृष्ण आश्रमाचे बांधकाम गेल्या 8 ते 9 महिन्यापासून चिखली येथील ठेकेदार आमीन हे करीत असून त्यांच्या कामावर चिखली येथील मजूर कामगार आहेत. आज सकाळी आश्रमातील काही लोकांना आश्रमाच्या पाठीमागे काहीतरी जळत आहे म्हणून पाहण्यासाठी गेले असता, त्यांना एक जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. यावेळी त्यांनी पोलोलीस पाटलांना माहिती दिली. त्यामुळे गावात माहिती मिळताच घटनास्थळी मोठ्या संख्येने गावकरी गोळा झाले. त्याचबरोबर अंढेरा पोलीस ही घटनास्थळी दाखल होताच गावकऱ्यांच्या उपस्थित पंचनामा केला. हा खुनाचा प्रकार असल्याचा संशय पोलिसांना आला आसता पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे वरुण शेख रहिश या कामगार मजुराला संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे. मजूर शेख रईस याने चिखली येथून मृतकाला कामावर नेले होते. तीन ते चार दिवस मृतकाचे त्याठिकाणी कामही केले. मात्र आज सकाळी जळालेला मृतदेह आढळला आरोपीच्या चौकशीनंतरच यातील सत्य समोर येईल. या घटनांमुळे गावकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.