Buldana Hanuman | जगातील सर्वात उंच हनुमान मूर्ती बुलडाण्यात, हनुमान नगरीत मूर्तीला चढविला 5 क्विंटल फुलांचा हार

गेल्या 22 वर्षांपासून ह्या ठिकाणी हनुमान जयंती निमित्त विविध कार्यक्रम राबवले जातात. हनुमान जयंतीला उंच उंच मूर्तीवर 5 क्विंटल वजनाचा फुलांचा हार (Flower garland) चढवण्यात येतो. यंदाही तो चढण्यात आला आहे.

Buldana Hanuman | जगातील सर्वात उंच हनुमान मूर्ती बुलडाण्यात, हनुमान नगरीत मूर्तीला चढविला 5 क्विंटल फुलांचा हार
नांदुरा येथील 105 फूट उंच हनुमान मूर्तीImage Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Apr 16, 2022 | 5:22 PM

बुलडाण्यातील नांदुरा शहरात जगप्रसिद्ध 105 फूट उंच हनुमान मूर्ती स्थळी भाविकांनी आज गर्दी केली. मूर्तीला 5 क्विंटल फुलांचा हार चढविण्यात आला. जगातील सर्वात उंच हनुमान मूर्ती बुलडाण्यात आहे. बुलडाणा जिल्ह्यात नांदुरा शहरात जगातील सर्वात उंच हनुमान मूर्ती आहे. या ठिकाणी मोठ्या जल्लोषात हनुमान जयंती साजरी करण्यात येत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा (Nandura) शहरात 2000 साली या 105 उंच हनुमान मूर्तीची स्थापना करण्यात आली. 2003 मध्ये लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये (Limca Book of World Records ) या उंच हनुमान मूर्तीची नोंद करण्यात आली आहे. गेल्या 22 वर्षांपासून ह्या ठिकाणी हनुमान जयंती निमित्त विविध कार्यक्रम राबवले जातात. हनुमान जयंतीला उंच उंच मूर्तीवर 5 क्विंटल वजनाचा फुलांचा हार (Flower garland) चढवण्यात येतो. यंदाही तो चढण्यात आला आहे.

हनुमान मूर्तीची नोंद गिनीज बुक ऑफ लिम्कामध्ये

गेल्या अडीच वर्षात कोरोनामुळे हनुमान जयंती उत्सवावर निर्बंधाच सावट होतं. मात्र या वर्षी महाराष्ट्र कोरोना मुक्त असल्याने सर्व नियम शिथिल झाले आहेत. त्यामुळे बुलडाण्यात हनुमान जयंतीचा हा उत्सव थाटामाटात साजरा होताना पाहायला मिळत आहे. हनुमान जयंतीनिमित्त नांदुरा येथील जगप्रसिद्ध हनुमानाच्या मूर्तीला आज सकाळी जलाभिषेक करण्यात आला. जगातील सर्वात उंच असलेल्या हनुमान मूर्तीची नोंद गिनीज बुक ऑफ लिम्कामध्ये आहे. आजपासून हनुमान जयंती निमिताने याठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत.

ओम नमो भगवते वायुनंदनाय नम:

कोरोनामुळे मागील दोन वर्षात याठिकाणी कुठलेही सार्वजनिक कार्यक्रम झालेले नाहीत. मात्र आता निर्बंध हटविल्या गेल्याने या ठिकाणी उत्सव साजरा होत आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून साडेतीनशे किलोंचा हार हनुमान जयंतीला मूर्तीला अर्पण करण्याची प्रथा आहे. यासाठी हार स्वयंचलित वायर रोपवरून रिमोटद्वारे चढवण्यात येतो. यावेळी उपस्थित पवनसुताच्या भाविकांनी ‘ओम नमो भगवते वायुनंदनाय नम:’ असा जयघोष केला. येत्या आठवडाभर येथे धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत. या विशालकाय उंच मूर्तीमुळे नांदुरा या गावाला 2001 पासून नवीन ओळख मिळाली आहे. ती म्हणजे हनुमान नगरी! याठिकाणी हजारो भाविक दर्शनासाठी येतात. वर्षभर या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम होत असतात. आज हनुमान जयंती असल्याने हजारो भक्त याठिकाणी सकाळपासूनच पूजा अर्चा करण्यासाठी आले.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.