Buldana Tourism | बुलडाण्यात ऐतिहासिक स्मारकांची QR कोडमधून पर्यटकांना माहिती; राज्यातील पहिलाच प्रयोग सिंदखेड राजामधून…

'मी सिंदखेड राजा बोलतोय' या क्यू आर कोड ॲपचा माध्यमातून राज्य पुरातत्व विभागाकडून ऐतिहासिक स्मारकांना क्यू आर कोड लावण्यात आलाय. पर्यटकांना मोबाईलच्या साहाय्याने माहिती मिळणार आहे. महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रयोग असल्यामुळे पर्यटकांना सुद्धा त्याची उत्सुकता लागलेली आहे.

Buldana Tourism | बुलडाण्यात ऐतिहासिक स्मारकांची QR कोडमधून पर्यटकांना माहिती; राज्यातील पहिलाच प्रयोग सिंदखेड राजामधून...
बुलडाण्यात ऐतिहासिक स्मारकांची QR कोडमधून पर्यटकांना माहितीImage Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Apr 19, 2022 | 11:16 AM

बुलडाणा : जागतिक वारसा दिनानिमित्त ‘मी सिंदखेड राजा बोलतोय’ (I am talking about Sindkhed Raja) या ॲपचा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ (Mother of the Nation Rajmata Jijau) यांच्या राजवाडा येथे शुभारंभ करण्यात आलाय. मोबाईलमधील प्ले स्टोरमध्ये जाऊन ॲप्स ओपन केल्यानंतर सर्वप्रथम वास्तूला लावण्यात आलेल्या ॲप्स स्कॅन करावे. त्यानंतर त्या व्यक्तीचे नाव घेऊन ‘नमस्कार तुम्ही आज सिंदखेड राजा येथे आला आहात, आता तुम्ही उभे आहात माँ जिजाऊच्या जन्मस्थळावर’ (Birthplace of Maa Jijau) अशा प्रकारची सुरुवात पहायला मिळत आहे. पर्यटकांनी सिंदखेड राजा येथे आल्यानंतर ‘मी सिंदखेड राजा’ या नावाचे मोबाईल ॲप्स डाऊनलोड करणे आवश्यक आहे. ऐतिहासिक ठिकाणाची संपूर्ण माहिती मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषांमध्ये असणार आहे.

पुरातत्व विभागाचा राज्यातील पहिला प्रयोग

‘मी सिंदखेड राजा बोलतोय’ या क्यू आर कोड ॲपचा माध्यमातून राज्य पुरातत्व विभागाकडून ऐतिहासिक स्मारकांना क्यू आर कोड लावण्यात आलाय. पर्यटकांना मोबाईलच्या साहाय्याने माहिती मिळणार आहे. महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रयोग असल्यामुळे पर्यटकांना सुद्धा त्याची उत्सुकता लागलेली आहे. राजे लखोजीराव जाधव यांच्या राजवाड्यासह ऐतिहासिक दहा ते बारा ठिकाणच्या वास्तूला क्यूआर कोड लावण्यात आले आहे. सर्वच क्षेत्रात डिजिटलचा टेक्नॉलॉजीचा उपयोग होताना दिसून येत आहे. त्यांचा उपयोग करून राज्य पुरातत्व विभागाच्या वतीने राज्यातील पहिलाच उपक्रम राबवून आगळा वेगळी सुरुवात केलीय.

अॅप्स करणार गाईडचं काम

महाराष्ट्रातून नव्हे तर देशभरातून मोठ्या संख्येने पर्यटक सिंदखेड राजा येथील ऐतिहासिक वास्तूची पाहणी करण्यासाठी येत असतात. परंतु काही वेळेस या ठिकाणी ऐतिहासिक वास्तूची माहिती देण्यासाठी गाईड नसल्यामुळे पर्यटकांना तिथली संपूर्ण माहिती मिळत नाही. त्यामुळे पाहणीसाठी आलेल्या पर्यटकांचा हिरमोड होतो. याच गोष्टीचा विचार करून राज्य पुरातत्त्व विभागाच्या वतीने डिजीटल टेक्नॉलॉजीचा उपयोग करून क्यूआर कोडचा वापर करण्यात आला आहे. अशी माहिती पुरातत्व विभागाच्या जया वाहाने यांनी दिली.

Curfew in Achalpur | अचलपुरात संचारबंदीचा दुसरा दिवस, शाळा-महाविद्यालयाच्या परीक्षा पुढं ढकलल्या; गावात तणावपूर्ण शांतता

Nitin Raut on Population | यंदाचं वर्ष लोकसंख्या नियंत्रण वर्ष म्हणून घोषित करा, डॉ. नितीन राऊत असं का म्हणालेत?

Chandrapur Temperature | चंद्रपुरात वीज वितरण यंत्रांनाच कुलर्स, का घेतली जातेय विशेष खबरदारी?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.