Buldana : पाऊस आला म्हणून झाडाखाली थांबले, क्षणात होत्याचं नव्हत झालं; वीज पडून दोघांचा मृत्यू, एक जखमी
बुलडाणा (Buldana) जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील निमकराळ येथे काल वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटसह जोरदार पावसाने (rain) हजेरी लावली. यामध्ये अंगावर वीज पडून दोन जणांचा मृत्यू झाला आहे तर एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.
बुलडाणा: बुलडाणा (Buldana) जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील निमकराळ येथे काल वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटसह जोरदार पावसाने (rain) हजेरी लावली. यामध्ये अंगावर वीज पडून दोन जणांचा मृत्यू झाला आहे तर एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. जळगांव जामोद (Jalgaon Jamod) तालुक्यातील निमकराळ, आडोळ, मांडवा, तिवडी, गौलखेड, दादुलगाव या परिसरात शनिवारी अचानक ढगाचा गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला आहे. मेघगर्जनेसह झालेल्या या पावसात मोठ्या प्रमाणात विजा ही चमकत होत्या. अंगावर वीज पडून निमकराळ गावात दोन जणांचा मृत्यू तर एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. अमोल रघुनाथ पिसे वय 22 वर्ष, मधूकर तुळशीराम उगले वय 56 वर्ष या दोघांचा या घटनेत मृत्यू झाला आहे. तर मधूकर उगले यांच्या पत्नी यमुना उगले या गंभीर जखमी झाल्या आहेत.
झाडावर कोसळली वीज
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, सध्या खरीप हंगामातील शेतीची कामे सुरू आहेत. निमकराळ येथील एका शेतात अमेल पिसे, मधूकर उगले आणि मधूकर उगले यांच्या पत्नी यमुना उगले हे काम करण्यासाठी गेले होते. काम सुरू असताना अचानक वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. म्हणून त्यांनी एका झाडाखाली असारा घेतला. मात्र असारा घेतलेल्या झाडावरच विज कोसळली. या दुर्दैवी घटनेत अमोल रघुनाथ पिसे आणि मधूकर तुळशीराम उगले यांचा जागीच मृत्यू झाला तर यमुना उगले या गंभीर जखमी झाल्या आहेत.
जखमी महिलेवर रुग्णालयात उपचार
या दुर्घटनेत अमोल पिसे आमि मधूकर उगले यांचा जागीच मृत्यू झाला. तर मधूकर उगले यांच्या पत्नी यमुना उगले या गंभीर जखमी झाल्या होत्या. दरम्यान घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थानी घटनास्थळी धवा घेतली. यमुना उगले यांना ग्रामस्थांनी रुग्णालयात दाखल केले असून, त्याच्यांवर उपचार सुरू आहेत. यंदा राज्यात अनेक ठिकाणी वीज कोसळल्याच्या घटना घडल्या असून, यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.