Buldana Accident | बुलडाण्यात दोन ट्रकची समोरासमोर धडक, अपघातानंतर ट्रकला आग, चालक गंभीर जखमी

ट्रक जळत होता. तेव्हा अग्नीच्या ज्वाळा भडकल्या होत्या. आकाशात धूर दिसत होता. इकडं रुग्णाला रुग्णालयात नेण्यासाठी हालचाली सुरू होत्या. चांदरेवर जखमी रुग्णाला ठेवण्यात आले. त्याला चादरेतून उचलून अॅम्बुलन्समध्ये बसविण्यात आले. त्यानंतर रुग्णालयात पाठविण्यात आले. यावेळी लोकांनी खूप मोठी गर्दी केली होती. या बर्निंग ट्रकमुळं वाहतूक खोळंबली होती. पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.

Buldana Accident | बुलडाण्यात दोन ट्रकची समोरासमोर धडक, अपघातानंतर ट्रकला आग, चालक गंभीर जखमी
बुलडाण्यात दोन ट्रकची समोरासमोर धडक, अपघातानंतर ट्रकला आगImage Credit source: t v 9
Follow us
| Updated on: Jun 11, 2022 | 3:17 PM

बुलडाणा : जिल्ह्यातील नांदुरा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग सहावर मुंधडा पेट्रोल पंपाजवळ (Petrol Pump) दोन ट्रकमध्ये समोरा-समोर धडक झाली. एका ट्रकला आग लागल्याने ट्रक पूर्णपणे जळून खाक झालाय. अपघातात जखमी झालेल्या ट्रक चालकाला आणि त्याच्या साथीदाराला नागरिकांनी बाहेर काढले. दोघांनाही रुग्णालयात उपचारासाठी हलविले. मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) समीर पठाण आणि फिरोज खान अशी जखमींची नावं आहेत. अपघातातील एक ट्रक खामगाववरून मलकापूरकडे (Malkapur) जात होता. दुसरा ट्रक नांदुऱ्यावरून खामगावकडे येत होता. दोघांत भीषण अपघात झाला. या अपघातात एका ट्रकने पेट घेतला. ट्रक जळून खाक झाला. घटनेची माहिती मिळताच नांदुरा पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहचले. आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत ट्रक पूर्णपणे खाक झाला. यावेळी मात्र काही वेळासाठी या रस्त्यावरील वाहतूक ही प्रभावित झाली होती.

नांदुऱ्यात द बर्निंग ट्रक

ट्रक जळत होता. तेव्हा अग्नीच्या ज्वाळा भडकल्या होत्या. आकाशात धूर दिसत होता. इकडं रुग्णाला रुग्णालयात नेण्यासाठी हालचाली सुरू होत्या. चांदरेवर जखमी रुग्णाला ठेवण्यात आले. त्याला चादरेतून उचलून अॅम्बुलन्समध्ये बसविण्यात आले. त्यानंतर रुग्णालयात पाठविण्यात आले. यावेळी लोकांनी खूप मोठी गर्दी केली होती. या बर्निंग ट्रकमुळं वाहतूक खोळंबली होती. पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. पण, बर्निंग ट्रकचा थरार पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. नांदुरा पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी केलेल्या कारवाईमुळं वाहतूक सुरळीत झाली.

ट्रकचा जळून कोळसा

मुंधडा पेट्रोलपंपजवळ नांदुरा शहरात घटना घडल्यानं बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. पोलिसांनी ट्रक बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. समीर पठाण व फिरोज खान अशी जखमींची नाव आहेत. जीवितहानी झाली नसली, तरी ट्रकचा जळून कोळसा झाला. ट्रक मालकाचं मोठं नुकसान झालं.

हे सुद्धा वाचा

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.