Buldhana Accident : बुलढाण्यात टिप्परची मोटारसायकलला धडक, अपघातात काका-पुतण्या ठार एक गंभीर

देशमुख काका पुतणे मोटारसायकलवरुन ट्रिपल सीट बुलढाणा जिल्ह्यातील जलंबवरुन माटरगावकडे जात होते. याचदरम्यान जलंब ते माटरगाव या मार्गावर त्यांच्या बाईकला मागून भरधाव वेगात येणाऱ्या टिप्परने जबर धडक दिली. धडक दिल्यानंतर एकाच्या अंगावरुन टिप्पर गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर इतर दोन जण गंभीर जखमी झाले.

Buldhana Accident : बुलढाण्यात टिप्परची मोटारसायकलला धडक, अपघातात काका-पुतण्या ठार एक गंभीर
बुलढाण्यात टिप्परची मोटारसायकलला धडकImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 05, 2022 | 8:26 PM

बुलढाणा : भरधाव वेगाने जाणाऱ्या टिप्परने मोटार सायकलला मागून जबर धडक देत दोघांना चिरडल्याची घटना बुलढाण्यात घडली आहे. या अपघाता (Accident)त दोन जण ठार (Death) झाले असून एक जण गंभीर जखमी आहे. मयत दोघे काका-पुतण्या आहेत. जखमीला उपचारासाठी खामगावच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शाम भीमराव देशमुख आणि पार्थ गंभीरराव देशमुख अशी मयतांची नावे आहेत. तर कुणाल भैय्या देशमुख असे गंभीर जखमीचे नाव आहे. याप्रकरणी जलंब पोलिस ठाण्यात टिप्पर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Two were killed and one was seriously injured when a tipper hit a motorcycle in Buldhana)

टिप्परने चिरडल्याने एकाचा जागीच मृत्यू, दोन गंभीर जखमी

देशमुख काका पुतणे मोटारसायकलवरुन ट्रिपल सीट बुलढाणा जिल्ह्यातील जलंबवरुन माटरगावकडे जात होते. याचदरम्यान जलंब ते माटरगाव या मार्गावर त्यांच्या बाईकला मागून भरधाव वेगात येणाऱ्या टिप्परने जबर धडक दिली. धडक दिल्यानंतर एकाच्या अंगावरुन टिप्पर गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर इतर दोन जण गंभीर जखमी झाले. जखमींना तात्काळ उपचारासाठी खामगावच्या रुग्णालयाच हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला तर दुसऱ्यावर उपचार सुरु आहेत. काका शाम भीमराव देशमुख आणि पुतण्या पार्थ देशमुख यांचा मृत्यू झाला तर कुणाल देशमुखवर उपचार सुरु आहेत. याप्रकरणी टिप्पर चालकाविरोधात जलंब पोलिसात गुन्हा दाखल करत पोलिस पुढील कारवाई करत आहेत. (Two were killed and one was seriously injured when a tipper hit a motorcycle in Buldhana)

हे सुद्धा वाचा

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.