“आम्ही कर्जमाफी करणार होतो, पण या ‘रेड्यांनी’ शेण खाल्लं”, उद्धव ठाकरे यांनी आतली गोष्ट सांगितली?
"आम्ही कर्जमाफी करणार होतो. पण या रेड्यांनी शेण खाल्लं", असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला.
बुलढाणा : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज बुलढाण्यातील चिखली येथे शेतकरी संवाद मेळावा घेतला. यावेळी त्यांनी आपल्या सरकार काळात आपण शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी करणार होतो. पण शिंदे गटात गेलेल्यांमुळे ते शक्य होऊ शकलं नाही, असं उद्धव ठाकरे अप्रत्यक्षपणे म्हणाले. यावेळी त्यांनी शिंदे गट आणि भाजपवर सडकून टीका केली.
“आम्ही कर्जमाफी करणार होतो. पण या रेड्यांनी शेण खाल्लं. कुणाचं नुकसान झालं? शेतकऱ्यांचंच. मी मुख्यमंत्री असतो तर एकाही शेतकऱ्याची आत्महत्या होऊ दिली नसती”, असा दावा उद्धव ठाकरेंनी केला.
“यांना शिवसेना फोडली असं वाटतंय. पण शिवसेना म्हणजे मेलेलं गाढव नाहीये. ही जिवंत रसरसती माणसं आहेत. शिवसेना तुम्ही कितीही फोडा. फोडून फोडून दमाल तुम्ही. पण माझी शिवसेना तुम्हालाच फोडून टाकून दिल्याशिवया राहणार नाही. निवडणवुका लांबवत आहेत”, असं ठाकरे म्हणाले.
“शिवसेनेवर घाव घातल्यानंतर मी तुमच्या भरवश्यावर उभा आहे. पण नुसता तुमच्या भरवश्यावर माझं दुख सांगायला आलो नाही. तर तुमच्या संकटात तुमच्यासोबत आहे हे सांगण्यासाठी आलो आहे. आत्महत्या करू नका”, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना केलं.
उद्धव ठाकरे आणखी काय-काय म्हणाले?
शिवरायाचं नाव घेतो. शिवरायांनी लढायला शिकवलं आहे. लंडनमधून तलवार आणणार असं हे म्हणाले. तलवार आणून चालणार नाही. त्यासाठी मनगटत हवं. ते पोलादी मनगट माझ्या मर्द मावळ्यात आहेत.
एका बाजूने शिवरायांचं नाव घेतात दुसऱ्या बाजूला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी महाराजांचा अवमान करतात. महाराजांचा अपमान कराल तर आम्ही एक तर विराट मोर्चा काढू किंवा आम्ही महाराष्ट्र बंद केल्याशिवया राहणार नाही.
तोतये बनावट गद्दार आहेत. त्यांचं कर्तृत्व शून्य आहे. ते तुम्हाला फसवत आहे. भाजपवाले तुम्हाला सांगतील. तुमच्यातला मुख्यमंत्री केला. हा मुख्यमंत्री तुम्हाला मान्य आहे का. दिवाळीत एक युट्यूबवर व्हिडीओ पाहिला. दिवाळीत मुख्यमंत्री रमले शेतीत. पाहिला का व्हिडीओ. पूर्वी भिंतीवर लिहिलेलं असायचं नारूचा रोगी कळवा आणि हजार रुपये मिळवा. आता तसं म्हणायचं का?
देशात दुसरा हेलिकॉप्टरने शेतीत जाणारा मुख्यमंत्री दाखवा आणि एक लाख रुपये मिळवा. हेलिकॉप्टर शेतात उतरतं. आणि तुम्ही शेतात पायी जाताना. दिवसा वीज असते की नसते. मग रात्रीचं जाता.
हा आमचा मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने शेतात जातो. माझं त्यांच्या सुबत्तेबद्दल काही म्हणणं नाही. पण महाराष्ट्रातील शेतकरी असा कधी होणार हा सवाल आहे. महाराष्ट्रातील शेतकरी कधी तरी हेलिकॉप्टरने जाणार का. तुम्ही ज्योतिषाकडे जाता. आमचा शेतकऱ्याच्या हातावरच्या रेषा पुसल्या त्याने कुणाला हात दाखवायचा.
तुम्ही पत्रकारांना घेऊन तुमच्या शेतात गेला. तसाच तुम्ही अतिवृष्टी झालेल्या शेतात पत्रकारांना का घेऊन गेला नाही? मला म्हणत होते मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाही. तेव्हा करोना होता. माझ्या मानेचं ऑपरेशन झालं. पण तरीही तुमचं काम केलं.
तुम्ही विदर्भात या, मराठवाड्यात या. तुम्ही एकदम घरातून बाहेर पडला थेट गुवाहाटीला जाता. शेतकऱ्यांची हालत सांभाळायची कुणी