Uddhav Thackeray Live : ‘मराठी मातीतील गद्दारी गाडायची असेल तर…’, उद्धव ठाकरे कडाडले, पाहा Live भाषण
मराठी मातीतील गद्दारी गाडायची असेल तर जिजाऊंचा आशीर्वाद घेऊनच पुढे जायला पाहिजे, म्हणून मी इथे आलोय", असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या आक्रमक भाषणाला सुरुवात केली.
बुलढाणा : “बऱ्याच महिन्यांनी मी आपल्या दर्शनाला आलोय. दसऱ्याचा मेळावा शिवतिर्थावर केला. तेव्हाच निश्चय केला होता की पुढची सभा बुलढाण्यात होईल, जिथे जिजाऊंचं जन्मस्थान आहे. कारण मराठी मातीतील गद्दारी गाडायची असेल तर जिजाऊंचा आशीर्वाद घेऊनच पुढे जायला पाहिजे, म्हणून मी इथे आलोय”, असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या आक्रमक भाषणाला सुरुवात केली.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज विदर्भ दौऱ्यावर आहेत. बुलढाणा येथे त्यांच्या शेतकऱ्यांसोबतचा संवाद आयोजित करण्यात आलाय. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे उद्धव ठाकरे यांचा शेतकरी संवाद मेळावा आयोजित करण्यात आला.
या मेळाव्याला हजारो शेतकरी आणि शिवसैनिकांनी हजेरी लावली. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात गेलेले खासदार प्रतापराव जाधव यांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंचा हा शेतकरी संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
उद्धव ठाकरे काय-काय म्हणाले? वाचा त्यांचं भाषण जसंच्या तसं
बुलढाण्यात जिथं जिजाऊंच जन्मस्थान आहे तिथे माझी सभा होईल हे मी सांगितलं होतं. मराठी मातीतील गद्दारी गाडायची असेल तर जिजाऊंचा आशीर्वाद घेऊनच गाडायची आहे. संविधान दिन आहे.
संविधान दिन म्हटल्यावर काय म्हणायचं हा प्रश्न आहे. हे संविधान आज सुरक्षित आहे का इथून सुरुवात होते. मी आणि प्रकाश आंबेडकर एका मंचावर आलो होतो. त्यांनी जो प्रश्न विचारला होता तो माझ्या मनात नाही सर्वांच्या मनात असला पाहिजे. कारण आज लोकशाही वाचवण्याची गरज आहे. आज हुकूमशाही हवी की लोकशाही हा प्रश्न आहे.
काही लोक ४० रेडे घेऊन गुवाहाटीला गेले. त्यांच्याच मंत्र्याने म्हटलं आमचे ४० रेडे तिकडे गेले आहे. मी मुख्यमंत्री झालो तेव्हा मी एकविरा देवीचे दर्शन घेतले. नंतर अयोध्येला गेलो होतो. हे गेल्या आठवड्यात हात दाखवायला गेले होते. ज्याचं भविष्य त्याला माहीत नाही तो आपलं भविष्य ठरवणार. तुमचं भविष्य सर्वांना माहीत आहे. यांचे मायबाप दिल्लीत आहेत. तुमचं भविष्य ठरविणारे दिल्लीत बसलेत. हिंदुत्व वाचवण्यासाठी शिवसेना सोडून गेल्याचं ते म्हणातता.
तुम्हाला पाहिल्यानंतर अन्याय जाळायला निघालेल्या या मशाली आहेत असं दिसतं. आपलं सरकार चांगलं चाललं होतं. यांनी आपलं सरकार पाडलं.