‘ज्यांना स्वत:चं भविष्य माहीत नाही ते आपलं भविष्य ठरवणार आहेत’; उद्धव ठाकरे यांचा विदर्भातून हल्लाबोल

"तुमचं भविष्य सर्वांना माहीत आहे. यांचे मायबाप दिल्लीत आहेत. तुमचं भविष्य ठरविणारे दिल्लीत बसलेत. हिंदुत्व वाचवण्यासाठी शिवसेना सोडून गेले", असा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीतून केला.

'ज्यांना स्वत:चं भविष्य माहीत नाही ते आपलं भविष्य ठरवणार आहेत'; उद्धव ठाकरे यांचा विदर्भातून हल्लाबोल
Follow us
| Updated on: Nov 26, 2022 | 7:14 PM

बुलढाणा : “काही लोक ४० रेडे घेऊन गुवाहाटीला गेले. त्यांच्याच मंत्र्याने म्हटलं आमचे ४० रेडे तिकडे गेले आहे. मी मुख्यमंत्री झालो तेव्हा मी एकविरा देवीचे दर्शन घेतले. नंतर अयोध्येला गेलो होतो. हे गेल्या आठवड्यात हात दाखवायला गेले होते. ज्याचं भविष्य त्याला माहीत नाही तो आपलं भविष्य ठरवणार. तुमचं भविष्य सर्वांना माहीत आहे. यांचे मायबाप दिल्लीत आहेत. तुमचं भविष्य ठरविणारे दिल्लीत बसलेत. हिंदुत्व वाचवण्यासाठी शिवसेना सोडून गेले”, असा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीतून केला.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज विदर्भ दौऱ्यावर आहेत. बुलढाणा येथे त्यांच्या शेतकऱ्यांसोबतचा संवाद आयोजित करण्यात आलाय. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे उद्धव ठाकरे यांचा शेतकरी संवाद मेळावा आयोजित करण्यात आला.

या मेळाव्याला हजारो शेतकरी आणि शिवसैनिकांनी हजेरी लावली. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात गेलेले खासदार प्रतापराव जाधव यांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंचा हा शेतकरी संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर सडकून टीका केली.

“इथल्या गद्दारांना तुम्हीच आमदार आणि खासदार केलं. या ताईंना धमक्या दिल्या. मुंबईवरून दलाल पाठवले जायचे. त्यांच्यावरील आरोप वाचले जायचे. त्यांच्या आजूबाजूच्या दलालांना अटक केली. पण ताई हुशार. ताईंनी थेट पंतप्रधानांना राखी बांधली. भैय्या मेरे राखी के बंधन को निभाना… तो फोटो छापून आणला. सीबीआय आणि ईडीची हिंमत आहे का मग अटक करायला. ही चालूगिरी आपल्याला समजत नाही का?”, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.

उद्धव ठाकरे आणखी काय-काय म्हणाले?

तुम्हाला पाहिल्यानंतर अन्याय जाळायला निघालेल्या या मशाली आहेत असं दिसतं. आपलं सरकार चांगलं चाललं होतं. यांनी आपलं सरकार पाडलं.

भाजप हा भाकड पक्ष झाला आहे. विचार संपले आहेत. नेते संपले आहेत. त्यांचे सर्व नेते आयात केलेले आहेत. हा आयात पक्ष आणि त्यांची दादागिरी सुरू आहे. या आयात पक्षाची दादागिरी मोडता येणार नाही का. हा पक्ष आहे का चोरबाजार आहे. यांच्याकडे काहीच शिल्लक राहिलं नाही.

संविधान दिन म्हटल्यावर काय म्हणायचं हा प्रश्न आहे. हे संविधान आज सुरक्षित आहे का इथून सुरुवात होते. मी आणि प्रकाश आंबेडकर एका मंचावर आलो होतो. त्यांनी जो प्रश्न विचारला होता तो माझ्या मनात नाही सर्वांच्या मनात असला पाहिजे. कारण आज लोकशाही वाचवण्याची गरज आहे. आज हुकूमशाही हवी की लोकशाही हा प्रश्न आहे.

काही लोक ४० रेडे घेऊन गुवाहाटीला गेले. त्यांच्याच मंत्र्याने म्हटलं आमचे ४० रेडे तिकडे गेले आहे. मी मुख्यमंत्री झालो तेव्हा मी एकविरा देवीचे दर्शन घेतले. नंतर अयोध्येला गेलो होतो. हे गेल्या आठवड्यात हात दाखवायला गेले होते. ज्याचं भविष्य त्याला माहीत नाही तो आपलं भविष्य ठरवणार. तुमचं भविष्य सर्वांना माहीत आहे. यांचे मायबाप दिल्लीत आहेत. तुमचं भविष्य ठरविणारे दिल्लीत बसलेत. हिंदुत्व वाचवण्यासाठी शिवसेना सोडून गेल्याचं ते म्हणातता.

तुम्हाला पाहिल्यानंतर अन्याय जाळायला निघालेल्या या मशाली आहेत असं दिसतं. आपलं सरकार चांगलं चाललं होतं. यांनी आपलं सरकार पाडलं.

कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुपलं, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुपलं, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....