Marathi News Maharashtra Buldhana Village development officer of Dongaon gives lessons to women sarpanches, why? How to eat two numbers of money...
Video Buldana : डोनगावचे ग्रामविकास अधिकारी देतात महिला सरपंचांना धडे, कशाचे? दोन नंबरचे पैसे कसे खातात याचे…
या ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी, लिपिक आणि महिला सरपंचाच्या वार्तालापाचा व्हिडिओ हाती लागलाय. यामध्ये ग्रामविकास अधिकारी आणि लिपिक हे महिला सरपंचाला पैसे कसे खायचे ?, ते धडे देताना दिसत आहेत.
डोनगावचे ग्रामविकास अधिकारी देतात महिला सरपंचांना धडे, कशाचे? दोन नंबरचे पैसे कसे खातात याचे...
बुलडाणा : सरपंच म्हणून निवडून येण्यासाठी पैसे खर्च करावे लागतात. कोणतीही निवडणूक बिना पैशानं लढता येणं अशक्यचं असतं. अशात निवडून आल्यानंतर ते पैसे व्याजासकट काढावे लागतात. ते कसे काढायचं याचं प्रशिक्षण हवं असेल तर बुलडाणा जिल्ह्यातील डोनगावच्या ग्रामविकास अधिकाऱ्याकडं त्याचे धडे मिळतात. होय, हा ग्रामविकास अधिकारी (Village Development Officer) व्हिडीओमध्ये पैसे खाणे हा तुम्हाला बहाल केलेला अधिकार असल्याचं म्हणतो. हा व्हिडीओ 27 जुलैचा आहे. पण, आता सोशल मीडियावर पसरला नि हा ग्रामविकास अधिकारी बदनाम झाला. जनता चोर आहे. पैसे खाणे हा तुम्हाला बहाल केलेला अधिकार आहे. असं ग्रामविकास अधिकारीचं महिला सरपंचाला धडे देत आहे. डोनगाव (Dongaon) ग्रामपंचायतीमधील वार्तालाप टीव्ही 9 च्या हाती लागला. मेहकर (Mehkar) तालुक्यातील डोनगाव ग्रामपंचायत ही जिल्ह्यातील मोठी ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी, लिपिक आणि महिला सरपंचाच्या वार्तालापाचा व्हिडिओ हाती लागलाय. यामध्ये ग्रामविकास अधिकारी आणि लिपिक हे महिला सरपंचाला पैसे कसे खायचे ?, ते धडे देताना दिसत आहेत.
पाहा व्हिडीओ
Buldana : डोनगावचे ग्रामविकास अधिकारी देतात महिला सरपंचांना धडे, कशाचे? दोन नंबरचे पैसे कसे खातात याचे… pic.twitter.com/RuXgPAeDiG
बुलडाणा जिल्ह्यातील डोनगाव ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी ज्ञानेश्वर चणखोरे हे नेहमीच या ना त्या कारणाने वादग्रस्त ठरलेले आहेत. त्यांच्याविषयी अनेकांनी वरिष्ठांकडे तक्रारी केल्या. मात्र ग्रामविकास अधिकारी चनखोरेंवर राजकीय आशीर्वाद असल्याने त्यांच्यावर अद्यापही कारवाई झाली नाही. त्यातच आता या ग्रामविकास अधिकारी, लिपिक आणि महिला सरपंच यांच्या वार्तालापाचा व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओमध्ये ग्रामविकास अधिकारीच महिला सरपंच रेखा पांडव यांना पैसे कैसे खायचे ? ते धडे देताना दिसतोय.
भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करावी
जनता ही चोर असून चोरांनी पैसे घेऊन मतदान केलेय. त्यामुळे पावसाळा आला की डोळे, कान बंद करुन टाकायचे. जसे जळलं तसे जळू द्यायचे, असा सल्लाही ग्रामविकास अधिकारी चनखोरे सरपंचाला देतोय. पैसे खाणे हा तुम्हाला बहाल केलेला अधिकार असल्याचे ही ग्रामविकास अधिकारी सरपंचाला सांगत आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतमध्ये अनेक कामांत भ्रष्टाचार झाला आहे. या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर आणि सरपंचावर चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थ चरण आखाडे यांनी केलीय. गाव विकासाच्या सल्ल्याऐवजी भ्रष्टाचार कसा करायचा, असा सल्ला देणाऱ्या या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करतात?, याकडे सर्वांचे लक्ष लागलंय.