Buldana ZP School : बुलडाण्यात शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत, चक्क ट्रॅक्टरवरून काढली मिरवणूक
आसलगावची जिल्हा परिषदेची शाळा उपक्रमशील आहे. त्यांनी शाळेत पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करायचं ठरविलं. त्यासाठी ट्रॅक्टर सजविण्यात आला. विद्यार्थ्यांनाही टोप्या घालून देण्यात आल्या. ट्रॅक्टरवर विद्यार्थ्यांना बसविण्यात आलं. गावात त्यांची मिरवणूक काढण्यात आली. भारत माता की जय चा घोष विद्यार्थ्यांनी केला.
बुलडाणा : जिल्ह्यातील जवळपास सर्वच शाळा सुरू झाल्यात. जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे अनोखे स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांची चक्क ट्रॅक्टरवरून मिरवणूक (Procession) काढण्यात आली. एवढेच नव्हे तर विद्यार्थ्यांच्या हातानेच रिबीन कापून शाळेमध्ये प्रवेश करण्यात आला. आसलगाव ( Asalgaon) येथील जिल्हा परिषदेची ही सर्वात मोठी शाळा म्हणून ओळखली जाते. या शाळेमध्ये 400 ते साडेचारशे पटसंख्या असणारी शाळा आहे. यावर्षी शाळेतील शिक्षकांनी नवीन उपक्रम राबवला. आपल्या शाळेमध्ये पहिल्या वर्गातील विद्यार्थ्यांचे स्वागत हे जंगी व्हावे आणि पालकांचा कल जिल्हा परिषद शाळेकडे वाढावा. तसेच विद्यार्थ्यांचा उत्साह वाढावा, या उद्देशाने पहिल्या वर्गातील विद्यार्थ्यांना सरळ ट्रॅक्टरमध्ये (Tractor) बसून गावामधून मिरवणूक काढण्यात आली.
पाहा व्हिडीओ
गावातून काढण्यात आली मिरवणूक
गेल्या दोन वर्षांपासून शाळा बंद. त्यामुळं विद्यार्थी घरीच होते. शाळेत केव्हा जाणार याची उत्सुकता त्यांना लागली होती. आसलगावची जिल्हा परिषदेची शाळा उपक्रमशील आहे. त्यांनी शाळेत पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करायचं ठरविलं. त्यासाठी ट्रॅक्टर सजविण्यात आला. विद्यार्थ्यांनाही टोप्या घालून देण्यात आल्या. ट्रॅक्टरवर विद्यार्थ्यांना बसविण्यात आलं. गावात त्यांची मिरवणूक काढण्यात आली. भारत माता की जय चा घोष विद्यार्थ्यांनी केला.
विद्यार्थी जोरात
विद्यार्थ्यांच्या हातानं रिबीन कापण्यात आली. विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजविल्या. यावेळी विद्यार्थ्यांचा आनंद ओसंडून वाहत होता. यावेळी विद्यार्थ्यांना रंगीबिरंगी टोप्या घातल्या होत्या, तर ट्रॅक्टरला सजवण्यात आले होते. विद्यार्थ्याचा उत्साह द्विगुणीत करणे, जिल्हा परिषदेची शाळा काही कमजोर नाहीत. हे त्यांना दाखवून द्यायचं होते. जिल्हा परिषदेच्या शाळेत चांगलं शिक्षण मिळते. खासगी शाळांच्या तुलनेत त्या काही कमी नाही. ज्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक मेहनत घेतात, तिथंली संख्या काही कमी होत नाही. पण, काही जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक आळशी झाल्यानं त्यांच्या शाळेची पटसंख्या कमी होत असल्याचं चित्र आहे.