राज ठाकरे मंचावर येताच तरुणाची घोषणाबाजी अन् राडा, बुलढाण्यात नेमकं काय घडलं?

राज ठाकरे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान ते आज बुलढाण्यात पोहोचले. राज ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बुलढाण्यात एका सभागृहात बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. पण या कार्यक्रमासाठी राज ठाकरे मंचावर येताच एका तरुणाने जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे सभागृहात तणाव निर्माण झाला.

राज ठाकरे मंचावर येताच तरुणाची घोषणाबाजी अन् राडा, बुलढाण्यात नेमकं काय घडलं?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे
Follow us
| Updated on: Aug 25, 2024 | 7:14 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासमोर गोंधळ उडाल्याचं बघायला मिळालं. राज ठाकरे बुलढाण्यात मंचावर दाखल झाले तेव्हा हा प्रकार बघायला मिळाला. राज ठाकरे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार तेवढ्यात सभागृहात घोषणाबाजी सुरु झाली. विशेष म्हणजे याआधी धाराशिव आणि बीडमध्ये मोठा राडा झाल्याचं बघायला मिळालं होतं. यानंतर राज ठाकरे आज बुलढाणा दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे बुलढाण्यात कार्यक्रमासाठी मंचावर आले तेव्हा काही तरुणांनी घोषणाबाजी केली. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करणाऱ्या तरुणांना बाहेर काढलं. यानंतर राज ठाकरे यांनी आपलं बोलणं सुरु केलं. यावेळी राज ठाकरेंनी घोषणाबाजी करणाऱ्या तरुणांना चांगलाच टोला लगावला. तसेच त्यांनी सभागृहात फक्त प्रमुख पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी थांबण्यास सांगितलं आणि इतरांना सभागृहातून बाहेर पडण्याचे आदेश दिले.

राज ठाकरे काय म्हणाले?

“मी इथे भाषण करायला आलेलो नाही किंवा मेळावा घ्यायलादेखील आलेलो नाही. हा माझा काही संवाद दौरा नाही. दिवळीनंतर विधानसभेच्या निवडणुका राहतील. त्या विधानसभा निवडणुकांसाठी हा माझा मराठवाड्यापासून सुरु झालेला चाचपणी दौरा आहे. विधानसभेची निवडणूक बुलढाणा जिल्ह्यात लढवली पाहिजे की नको? नुसतं हो म्हणून होत नसतं. मी तुमचा सर्वांचा उत्साह समजू शकतो. पण त्यासाठी जे काम करावं लागतं ते काम करण्यासाठी मी आलो आहे. मला आपल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी इथे चर्चा करायची आहे. त्यांच्यासोबत चर्चा करायची तुम्ही संधी दिलीत तर मी आल्याचं काहीतरी निषपन्न होईल”, असं राज ठाकरे म्हणाले.

“तुम्ही कोणाच्याही नावाने घोषणा दिलं तरी त्याचं तिकीट कन्फर्म झालं, असं समजू नका. तसं होणार नाही, आणि जेवढ्या जोराने ओरडाल तेवढं तिकीट कापलं जाईल”, असं राज ठाकरे म्हणाले.

‘कृपया मला हा हॉल रिकामा करुन द्या’

“कृपया मला हा हॉल रिकामा करुन द्यावा. मला प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करायची आहे. याच्यात जिल्हाध्यक्ष, उपजिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, उपशहराध्यक्ष या सर्वांनी इथे बसून घ्यावं. महिला पदाधिकाऱ्यांनी बसून घ्यावं. कामगार सेना, विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी थांबावं आणि इतरांनी हॉलच्या बाहेर पडावं”, असं आवाहन राज ठाकरे यांनी यावेळी केलं.

पाहा नेमकं काय घडलं?

मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.