Bullock cart race | काय सांगता? बैलगाडा शर्यतीतील विजेत्यास मिळणार चक्क 1 BHK फ्लॅट, कुठे आहे स्पर्धा?

Bullock cart race | महाराष्ट्राच्या बैलगाडा शर्यतीच्या इतिहासातील हे सर्वात मोठे बक्षीस आहे. फक्त 1 BHK फ्लॅटच नाही, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या विजेत्यास इतक्या लाखाचे पारितोषिक मिळणार आहे. कुठल्या नेत्याच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

Bullock cart race |  काय सांगता? बैलगाडा शर्यतीतील विजेत्यास मिळणार चक्क 1 BHK फ्लॅट, कुठे आहे स्पर्धा?
Bullock cart race
Follow us
| Updated on: Feb 14, 2024 | 7:38 AM

Bullock cart race (शंकर देवकुळे) | महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात बैलगाडा शर्यत प्रचंड लोकप्रिय आहे. तालुका-गाव पातळीवर अशा बैलगाडा शर्यतीच सातत्याने आयोजन होत असतं. या बैलगाडा शर्यतीची ग्रामीण भागात प्रचंड क्रेझ आहे. या बैलगाडा शर्यतीना राजकीय पुरस्कर्ते लाभल्याने मोठया रक्कमाची पारितोषिक दिली जातात. या बैलगाडा शर्यतीच्या माध्यमातून सर्वपक्षीय नेते जनमानसात आपली ओळख निर्माण करतात. आपला राजकीय दावा मजबूत करण्याचा त्याचा प्रयत्न असतो. या अशा शर्यतीतून बैलगाडा मालकांना मोठ्या रक्कमाची पारितोषिक मिळतात. प्रेक्षकांचा मनोरंजन होतं. त्यामुळे बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी जिल्हाभरातून लोक मोठ्या संख्येने येत असतात.

आता पर्यंत बैलगाडा शर्यतीमधील विजेत्याला थार गाडी आणि लाखोंचे बक्षीस देण्यात आली आहेत. मात्र, प्रथमच बैलगाडा शर्यतीमधील विजेत्यास चक्क 1 बीएचके फ्लॅट बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील या सगळ्यात मोठ्या बैलगाडी शर्यतीचे सांगलीच्या कासेगाव मध्ये आयोजन करण्यात आले आहे. जयंत केसरी असं या बैलगाडा स्पर्धेच नाव आहे.

दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाच्या विजेत्यास किती लाख मिळणार?

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कासेगाव येथील शरद लाहीगडे फाउंडेशनकडून 17 फेब्रुवारी रोजी या बैलगाडी शर्यतींचे आयोजन करण्यात आले असून दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाच्या विजेत्या बैलगाडीला 7 आणि 5 लाख रुपये बक्षीस देण्यात येणार आहे.

अन्य राज्यातून किती स्पर्धक येणार? किती लाख लोकांच्या बसण्याची क्षमता?

महाराष्ट्राच्या बैलगाडा शर्यतीच्या इतिहासातील हे सर्वात मोठे बक्षीस असून या स्पर्धेत महाराष्ट्र राज्यासह कर्नाटक, मध्यप्रदेश राज्यातून 200 हुन अधिक बैलगाडी स्पर्धक सहभागी होणार असून यासाठी 10 एकरावर मैदान तयार करण्यात आले आहे, त्याच 1 लाख प्रेक्षकांची आसन व्यवस्था करण्यात आल्याची माहिती शरद फाऊंडेशनचे अध्यक्ष अतुल लाहीगडे यांनी दिली आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.