‘सीएचएम’ परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; 23 ऑक्टोबरपासून नाशिकमध्ये होणार पेपर

अखेर 'सीएचएम' अर्थात शासकीय सहकारी व लेखा पदविका आणि सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले असून, येत्या 23 ऑक्टोबरपासून या परीक्षेचे पेपर होणार आहेत.

'सीएचएम' परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; 23 ऑक्टोबरपासून नाशिकमध्ये होणार पेपर
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Oct 20, 2021 | 8:49 PM

नाशिकः अखेर ‘सीएचएम’ अर्थात शासकीय सहकारी व लेखा पदविका आणि सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले असून, येत्या 23 ऑक्टोबरपासून या परीक्षेचे पेपर होणार आहेत.

सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मार्फत ही परीक्षा घेण्यात येते. 2020 ची ही परीक्षा 23, 24 व 25 ऑक्टोबर 2021 रोजी होणार आहे. त्या अनुषंगाने सदर परीक्षा नाशिक येथील के.टी.एच.एम. कॉलेजमधील मराठी हायस्कूल येथील नवीन व जुनी इमारत या परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे, अशी माहिती सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक डॉ. सतीश खरे यांनी दिली आहे. या परीक्षेसाठी ज्या उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज केले आहेत आणि ज्यांची निवड करण्यात आली आहे, असे उमेदवार पात्र असणार आहेत. परीक्षेसाठी लागणारे प्रवेशपत्र संबंधित उमेदवारांनी आपल्या ऑनलाईन युजर आयडीचा वापर करून प्राप्त करून घ्यावेत. अथवा प्रवेशपत्र वेळेवर प्राप्त न झाल्यास परीक्षार्थीनी फी भरलेला फॉर्म व चलनाच्या प्रतीवरुन यादीतील त्यांचे नाव तपासून पॅनकार्ड, मतदान कार्ड, वाहनचालक परवाना आदी ओळखपत्रांद्वारे संबंधीत परीक्षार्थीना परीक्षेस बसण्याची परवानगी देण्यात येणार आहे. परीक्षार्थींना परीक्षेबाबतच्या अधिक माहितीसाठी सारडा सर्कल येथील जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक यांच्या कार्यालयाच्या 0253-259155 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असेही सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक डॉ. सतीश खरे यांनी कळविले आहे.

असे आहे परीक्षेचे वेळापत्रक: – मॅनेजमेंट ऑफ को-ऑप हाऊसिंग सोसायटीज व अकाँट्स हा पेपर – 23 ऑक्टोबर 2021 – ऑडिटिंग व हिस्ट्री, प्रिन्सिपल्स ॲण्ड मॅनेजमेंन्ट इन को-ऑपरेशन हा पेपर – 24 ऑक्टोबर 2021 – को-ऑपरेटिव्ह लॉज ॲण्ड अदर लॉज व को-ऑपरेटिव्ह बँकींग अँड क्रेडिट सोसायटीज हा पेपर 25 ऑक्टोबर 2021.

परीक्षेसाठी लागणारे प्रवेशपत्र संबंधित उमेदवारांनी आपल्या ऑनलाईन युजर आयडीचा वापर करून प्राप्त करून घ्यावेत. अथवा प्रवेशपत्र वेळेवर प्राप्त न झाल्यास परीक्षार्थीनी फी भरलेला फॉर्म व चलनाच्या प्रतीवरुन यादीतील त्यांचे नाव तपासून पॅनकार्ड, मतदान कार्ड, वाहनचालक परवाना आदी ओळखपत्रांद्वारे संबंधीत परीक्षार्थीना परीक्षेस बसण्याची परवानगी देण्यात येणार आहे. – डॉ. सतीश खरे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था

इतर बातम्याः

दोन वेळा रद्द झालेल्या आरोग्य विभागाची भरती परीक्षा आता 24 ऑक्टोबरला; 2 हजार 739 रिक्त पदे भरणार

Gold Special: खणखणीत परतावा देणारं हुकमी नाणं म्हणजे बावनकशी सोनं, कसं ते जाणून घेऊयात!

नाशिकमधले दादासाहेब फाळके स्मारक कात टाकणार; दिग्दर्शक नितीन देसाई अन् मंत्राज स्पर्धेत

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.