MPSC Exam : राज्य सेवा पूर्व परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची माहिती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. ही परीक्षा रविवारी दिनांक 2 जानेवारी 2022 रोजी होणार होती. मात्र राज्यात अचानक कोरोना रुग्ण वाढल्याने खबरदारी म्हणून ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. आता ही परीक्षा दिनांक 23 जानेवारी 2022 रोजी आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले आहेत.
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (Maharashtra State Public Service Commission) घेण्यात येणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. ही परीक्षा (Exam) रविवारी दिनांक 2 जानेवारी 2022 रोजी होणार होती. मात्र राज्यात अचानक कोरोना(Corona) रुग्ण वाढल्याने खबरदारी म्हणून ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. आता ही परीक्षा दिनांक 23 जानेवारी 2022 रोजी आयोजित करण्यात आली आहे. याबाबत राज्य लोकसेवा आयोगाकडून एक प्रसिद्धपत्रक देखील जारी करण्यात आले आहे. महाराष्ट्रा लोकसेवा आयोगामार्फत 2 जानेवारी 2022 रोजी राज्य सेवा पूर्व परीक्षा घेण्यात येणार होती. मात्र ती पुढे ढकलण्यात आली होती. आता ही परीक्षा 23 जानेवारी रोजी होणार असल्याची माहिती या प्रसिद्धी पत्रकात देण्यात आली आहे. तसेच परीक्षेला बसलेल्या उमेदवारांसाठी देखील काही महत्त्वपूर्ण सूचना या प्रसिद्धी पत्रकात करण्यात आल्या आहेत. सोबत परीक्षेचे प्रवेशपत्र देखील जाहीर करण्यात आले आहेत
काय म्हटले आहे पत्रकात ?
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार, दिनांक 2 जानेवारी 2022 रोजी नियोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा 2021 आयोगाच्या संदर्भीय प्रसिद्धीपत्रकाद्वारे पुढे ढकलण्यात आली होती. आयोगाच्या सुधारित वेळापत्रकानुसार प्रस्तुत परीक्षा आता रविवार दिनांक 23 जानेवारी 2022 रोजी आयोजित करण्यात येणार आहे. रविवारी दिनांक 2 जानेवारी 2022 रोजी नियोजित परीक्षेकरीता आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे उमेदवारांना वितरित करण्यात आलेल्या प्रवेश प्रमाणपत्राच्या आधारे प्रवेश प्रमाणपत्रांमध्ये नमूद परीक्षा उपकेंद्रावर संबंधित उमेदवारांना प्रवेश देण्यात येईल.
कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना दिलासा
कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना अर्ज सादर करण्याची संधी देण्याबाबत शासनाकडून घेण्यात आलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने संबंधित उमेदवारांना प्रस्तुत परीक्षेकरीता अर्ज सादर करण्याची संधी देण्यात आली होती. त्यानुसार अर्ज सादर केलेल्या संबंधित उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीवरील उमेदवाराच्या खात्यामध्ये उपलब्ध करून देण्यात येत आहे. परीक्षा कक्षेत प्रवेश मिळविण्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करून प्रिंट केलेले मूळ स्वरूपातील प्रवेश प्रमाणत्रत्र सोबत आणणे अनिवार्य आहे. त्याच्याशिवाय परीक्षेस प्रवेश दिला जाणारर नाही. प्रवेश पत्र मिळण्यासाठी काही अडचणी निर्माण झाल्यास तातडीने आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर संपर्क साधावा.
आयोगामार्फत दिनांक २३ जानेवारी, २०२२ रोजी नियोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२१ च्या प्रवेश प्रमाणपत्राबाबत प्रसिध्दीपत्रक जारी करण्यात आले आहे. pic.twitter.com/ToUiedqqGc
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) January 14, 2022
संबंधित बातम्या
TET Exam Scam : पुणे पोलिसांंचं नवं टार्गेट, टीईटी परीक्षा घोटाळ्यातील एजंट निशाण्यावर