गाडी चालवताना वाहनचालकाला ह्रदयविकाराचा झटका, गाडीचे नियंत्रण गेले, मग रस्त्यात…
Accident nandurbar: गुजरातमधील GJ26AE5786 क्रमांकाची कार नंदुरबारजवळून जात होती. त्यावेळी वाहनचालकाला चालत्या गाडीत ह्रदयविकराचा झटका आला. त्यात कार चालकाचे निधन झाले. त्यानंतर कार अनियंत्रित झाली. अनियंत्रित झालेल्या या गाडीने रस्त्यावरील चौघांना उडवले.
सध्या ह्रदयविकाराचे रुग्ण वाढले आहेत. युवकांनाही ह्रदयविकाराचे झटके येत असल्याचे प्रकार अनेक वेळा घडले आहे. बदललेल्या जीवनशैलीमुळे ह्रदयविकार होण्याचे प्रकार वाढले आहे. नंदुरबारमधून अपघाताची वेगळीच घटना समोर आली आहे. गुजरातमधील एका कार चालकाला गाडी चालवताना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर गाडीवरील त्याचे नियंत्रण पूर्ण गेले. अनियंत्रित असलेल्या गाडीने रस्त्यावरील चौघांना उडवले. त्यात दोघांचा मृत्यू झाला आहे. तसेच दोन जण गंभीर जखमी आहे. ह्रदयविकार आलेल्या कार चालकाचाही मृत्यू झाला आहे.
कसा घडला प्रकार
गुजरातमधील GJ26AE5786 क्रमांकाची कार नंदुरबारजवळून जात होती. त्यावेळी वाहनचालकाला चालत्या गाडीत ह्रदयविकराचा झटका आला. त्यात कार चालकाचे निधन झाले. त्यानंतर कार अनियंत्रित झाली. अनियंत्रित झालेल्या या गाडीने रस्त्यावरील चौघांना उडवले. या अपघातमध्ये दोघांचा मृत्यू झाला. तसेच एका साठ वर्षीय भंगार विक्रेत्याचाही जागीच मुत्यू झाला. रस्त्याने पायी जाणारे आई आणि मुलगा गंभीर जखमी झाला आहे. रस्त्याला एके ठिकाणी धडक दिल्यानंतर गाडी थांबली.
या अपघाताची माहिती मिळताच नंदुरबार पोलिसांनी घटनास्थळी पोहचले. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्याचे काम सुरु होते.