रॅलीदरम्यान कोरोना नियम न पाळल्याचा ठपका, राजू शेट्टींवर गुन्हा दाखल
माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Raju Shetti Swabhimani sanghatana)
कोल्हापूर : विनापरवाना ट्रॅक्टर रॅली काढणे तसेच आपत्ती व्यवस्थापन कायद्याचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात नोंदविला असून त्यांच्यासोबत स्वाभिमानीच्या इतर 250 कार्यकर्त्यांवरसुद्धा गुन्हा दाखल केला आहे. स्वाभिमानीने सोमवारी (25 जानेवारी) सांगली ते कोल्हापूर अशा ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन केले होते. (case has been registered against the Raju Shetti and Swabhimani sanghatana activist)
मिळालेल्या माहितीनुसार केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारी सांगली ते कोल्हापूर अशी ट्रॅक्टर र्रली आयोजित केली होती. यावेळी या रॅलीचे नेतृत्व माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले. त्यांच्यासोबत दोनशे ते अडीचशे ट्रॅक्टरसह स्वाभिमानीचे इतर कार्यकर्तेही रॅलीमध्ये सहभागी झाले होते. याच रॅलीमध्ये कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन न केल्याचा ठपका राजू शेट्टींसह इतर कार्यकर्त्यांवर ठेवण्यात आला आहे. तसेच, यावेळी कोणतीही परवानगी नसताना शेट्टी यांनी ट्रॅक्टर रॅली काढल्याचही पोलिसांनी म्हटलं आहे. शेट्टींविरोधात कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री उशिराने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांना कार्पोरेटच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न
दरम्यान, राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांना जाहीर विरोध या आधी अनेकवेळा नोंदवेलला आहे. ‘कित्येक दशकांपासून हमीभावाला कायद्याचं स्वरूप द्या अशी मागणी करत आहे. पण, मोदी सरकार काळे कायदे आणून शेतकऱ्यांना कॉर्पोरेट हाऊसेसच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न करतंय,’ असा आरोप राजू शेट्टींनी 16 जानेवारी रोजी केला होता. तसेच मागील कित्येक दिवसांपासून शेतकरी कडाक्याच्या थंडीत दिल्लीच्या सीमेवर बसले आहेत. तापमान दीड डीग्री सेल्सिअस पर्यंत गेले आहे. 55 शेतकऱ्यांनी जीव गमावला तरी केंद्र सरकारला दया आली नाही, अशी टीकाही शेट्टी यांनी केली होती.
राज्यातलं सर्वात जास्त महाग पेट्रोल धर्माबादमध्ये, वाचा काय आहे कारण?https://t.co/CvNdQH0W6S#PetrolPriceHike #PetrolPrice #petrolprices #petroleum #majarashtra
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 26, 2021
संबंधित बातम्या :
राजू शेट्टींचा मुद्द्याला हात, महाविकास आघाडीवर पुन्हा घणाघात
आता ते चोराच्या आळंदीला पोहोचलेत, शेट्टींवर खोतांची टीका
(case has been registered against the Raju Shetti and Swabhimani sanghatana activist)