Anil Deshmukh: अनिल देशमुखांच्या घरी पीपीई किट घालून झाडाझडती; काळी बॅग आणि पिवळ्या पिशव्यांमध्ये नेमकं काय?

तब्बल 100 कोटी रुपयांच्या खंडणी वसुली प्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर सीबीआयने छापे मारले आहेत. (CBI books EX- Maharashtra Home Minister Anil Deshmukh on corruption charges)

Anil Deshmukh: अनिल देशमुखांच्या घरी पीपीई किट घालून झाडाझडती; काळी बॅग आणि पिवळ्या पिशव्यांमध्ये नेमकं काय?
anil deshmukh house
Follow us
| Updated on: Apr 24, 2021 | 10:55 AM

नागपूर: तब्बल 100 कोटी रुपयांच्या खंडणी वसुली प्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर सीबीआयने छापे मारले आहेत. पीपीई किट्स घालून सीबीआयचे अधिकारी छापेमारी करत आहेत. यावेळी एक काळी बॅग आणि दोन मोठ्या पिवळ्या पिशव्याही सीबीआय अधिकाऱ्यांच्या हातात दिसत आहेत. त्यामुळे या बॅग आणि पिशव्यांमध्ये नक्की काय आहे? याचे गूढ वाढले आहे. (CBI books EX- Maharashtra Home Minister Anil Deshmukh on corruption charges)

सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी आज पहाटे मुंबईपासून ते नागपूरपर्यंतच्या अनिल देशमुख यांच्या घर आणि कार्यालयावर छापेमारी केली आहे. एकूण दहा ठिकाणी हे छापे मारले आहेत. मुंबईतील ज्ञानेश्वरी बंगला आणि वरळीतील सुखदा इमारतीतील फ्लॅटवर पहाटेच सीबीआयने छाप मारले आहेत. ही छापेमारी करताना स्थानिक पोलिसांना त्यांची गंधवर्ताही देण्यात आली नव्हती. छापेमारीचं वृत्त कळल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बंदोबस्त वाढवला आहे.

नागपुरात सात ते आठ अधिकाऱ्यांची धाड

अनिल देशमुख हे नागपूरमध्ये आहेत. त्यांच्या नागपूर सिव्हिल लाईन परिसरातील निवासस्थानीही सीबीआयने धाड मारली आहे. पीपीई किट्स घालून काही लोक घरात झाडाझडती घेताना दिसत आहेत. तब्बल सात ते आठ अधिकारी देशमुखांच्या घरी आहेत. देशमुख यांच्यांशी काही सीबीआयचे कर्मचारी बोलत आहेत. सीबीआयच्या अधिकाऱ्यांच्या हातात एक काळी बॅग आणि दोन पिवळ्या पिशव्या होत्या. या पिशव्यांमध्ये महत्त्वाची कागदपत्रे असल्याचं बोललं जात आहे.

मॉर्निंग वॉकला जाऊन आले

दरम्यान, सीबीआयचा छापा पडण्यापूर्वी अनिल देशमुख हे आज सकाळी मॉर्निंग वॉकला जाऊन आले होते. त्यांच्या चालकाने ही माहिती दिली. देशमुख यांच्या घरी सीबीआयने धाड मारल्याचं त्याला माहीत नव्हतं. त्यामुळे त्यांचा चालक नेहमीप्रमाणे कामावर आला होता. देशमुख यांच्या घरी त्यांची पत्नी आणि मुलगा साहिलही असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

स्वीय सहायकाच्या घरावरही छापा

देशमुख यांच्या स्वीय सहायकाच्या घरावरही सीबीआयने छापे मारले असून त्यांच्याकडूनही सीबीआय माहिती घेत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

गृहमंत्री मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

दरम्यान, अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांच्या घरावर छापे मारण्यात आल्याने गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी पोहोचले. या दोन्ही नेत्यांमध्ये गेल्या 15 मिनिटांपासून चर्चा सुरू आहे. मात्र, या दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा सुरू आहे, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. (CBI books EX- Maharashtra Home Minister Anil Deshmukh on corruption charges)

संबंधित बातम्या:

अनिल देशमुखांविरोधात गुन्हा दाखल; घर, कार्यालयासह 10 ठिकाणी सीबीआयची छापेमारी

Anil Deshmukh: अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल; संजय राऊत म्हणतात…

LIVE | माजी गृहमंत्र्यांवर गुन्हा दाखल, गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांमध्ये बैठक

(CBI books EX- Maharashtra Home Minister Anil Deshmukh on corruption charges)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.