Rajesh Tope | केंद्र आणि राज्याचं टास्क फोर्स एकत्रित काम करणार; कोरोनाच्या सोबत जगण्याची नियमावली तयार व्हावी – आरोग्यमंत्री राजेश टोपे
केंद्र आणि राज्याचं टास्क फोर्स एकत्रित काम करणार आहेत. राज्यसरकारने व मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार स्टेट टास्क फोर्स , सेंट्रल टास्क फोर्स, आयसीएमआर यास सगळयांना कळवले पाहिजे की हा जो विज्ञानदृष्टीत निर्णय घेण्यात आलेला आहे. त्याबाबत महाराष्ट्रालाही मार्गदर्शन करण्यात यावे
मुंबई – कोरोनाच्या सोबत जगण्याची नियमावली तयार केली पाहिजे. कोरोनासोबत कसं जगायचं,(How to live with Corona) याचं लोकांना मार्गदर्शन , प्रबोधन करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी केंद्र आणि राज्याचं टास्क फोर्स एकत्रित काम करणार आहेत असल्या माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope)यांनी दिली आहे . अनेक देशात मास्क काढले जात आहेत. मात्र मास्क(mask)काढण्याबाबत इकडे तपासून निर्णय घेतला जाईल अशी माहिती त्यांनी दिली आहे. राज्यातील तिसऱ्या लाटेतील कोरोनाच्या स्थितीवर कॅबिनेटची बैठकीत चर्चा करण्यात आली.
तिसऱ्या लाटेतील रुग्णसंख्या वाढीचा वेग मंदावला तिसऱ्या लाटेत सद्यस्थितीला मुंबई, पालघर, ठाणे या ठिकाणी कोरोनाची रुग्णसंख्या वाढण्याचा जो ट्रेंड होता तो नक्कीच कमी झाल्याचे चित्र आहे. हीअत्यंत दिलासा दायक बातमी आहे. परन्यू पुणे , नाशिक , नागपूर या, औरंगाबाद या शहरात अजूनही रुग्ण वाढत आहेत. मात्र रुग्ण संख्या वाढत असतानासंपूर्ण महाराष्ट्र कुठेही पाच टक्क्यांपेक्षा अधिक रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण नाही. यामध्ये आयसीयु व व्हेंटिलेटरवरील रुग्णांचीसंख्या एका टक्क्यांपेक्षा अधिक नाही. या सगळ्यात आपण परदेशातातही कोरोनाची रुग्णसंख्या वाढताना दिसत आहेत. मात्र अनेक देशांनी मास्क मुक्त जीवनशैली तसेच कोरोनाचे निर्बंध कमी केले आहे.
महाराष्ट्राला मार्गदर्शन करावे केंद्र आणि राज्याचं टास्क फोर्स एकत्रित काम करणार आहेत. राज्यसरकारने व मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार स्टेट टास्क फोर्स , सेंट्रल टास्क फोर्स, आयसीएमआर यास सगळयांना कळवले पाहिजे की हा जो विज्ञानदृष्टीत निर्णय घेण्यात आलेला आहे. त्याबाबत महाराष्ट्रालाही मार्गदर्शन करण्यात यावे, या प्रकारच्या सूचना या बैठकीनंतर सेंट्रलला व आयसीएमआर सूचना केल्या आहेत.
कोरोना सोबत जगावे लागले आपण बघता आहोत की बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या बाधित होणाऱ्या रुग्णांच्या संख्येपेक्षा अधिक आहे . त्यामुळे आपल्या आता कोरोनासोबतच जगावे लागेल ही संकल्पना लक्षात घेऊन केंद्र सरकारने आपल्याला कोरोनासोबत जगायचं, अशाप्रकारे स्वीकारुन पुढे जावं लागेल कोरोनासोबत कसं जगायचं, याचं मार्गदर्शन लोकांना होण्याची गरज असल्याचे मत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे.
‘ही तर सरकारला मिळालेली सणसणीत चपराक!’ 12 आमदारांचं निलंबन रद्द होताच दरेकरांचा घणाघात
‘ही तर सरकारला मिळालेली सणसणीत चपराक!’ 12 आमदारांचं निलंबन रद्द होताच दरेकरांचा घणाघात
Rabi Season: वातावरण निवळले, शेतकऱ्यांना आता खतांची चिंता, चढ्या दराने होतेय विक्री .