Video: आधी मोदी आणि आता अमित शाह, सुजय विखे पुन्हा पुन्हा फ्रेममध्ये का येतात? का हटवले जातात?

सुजय विखे मदतीसाठी म्हणून धावले पण मोदी त्यांना ओळखतच नव्हते, त्यातून प्रसंग घडला असावा. पण त्याचवेळेस फडणवीसांनी दाखवलेलं प्रसंगावधान महत्वाचं ठरलं. हा खरं तर योगायोगच म्हणावा लागेल की, सुजय विखेआधी मोदी आणि आता अमित शाह यांच्या कॅमेऱ्यात आले आणि नंतर त्यांना सावरावं लागलं.

Video: आधी मोदी आणि आता अमित शाह, सुजय विखे पुन्हा पुन्हा फ्रेममध्ये का येतात? का हटवले जातात?
Follow us
| Updated on: Dec 25, 2021 | 10:40 PM

काही काही घटना खुप छोट्या असतात पण त्या वाऱ्यासारख्या पसरतात. बऱ्याच काळ त्या लोकस्मृतीत राहतात. त्यातही जर प्रत्येकाच्या हातात मोबाईल कॅमेरा असेल तर त्यात काय कैद होईल सांगता येत नाही. पण नगरमध्ये जी घटना कॅमेऱ्यात कैद झालीय ती मोबाईल कॅमेऱ्यातली नाही. मोठा टीव्हीच्या कॅमेऱ्यात हा क्षण कैद झालाय. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे गेल्या आठवड्यात नगर आणि पुण्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर होते. ह्या दोन दिवसात त्यांनी सहकाराशी संबंधीत कार्यक्रमात भाग घेतला. त्यातल्या एका कार्यक्रमात अहमदनगरचे खासदार सुजय विखे यांच्यासोबत घडलेला प्रसंग सध्या चर्चेत आहे आणि हा प्रसंग अर्थातच कॅमेऱ्यानं पकडल्यानं पाहिला जातोय.

नेमकं काय घडलं? केंद्रीय सहकार मंत्री असलेले अमित शाह हे 18 आणि 19 डिसेंबर असे दोन दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. 18 तारखेला ते शिर्डीत दाखल झाले. त्यानंतर ते विखे पाटलांच्या प्रवरानगरला आले. इथंच पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी कारखान्यावर सहकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या कार्यक्रमात राज्यभरातून सहकारी बँका, पतसंस्थांचे प्रतिनिधी हजर झाले होते. अर्थातच भाजपचे टॉपचे नेतेही कार्यक्रमाला हजर होते. याच कार्यक्रमात अमित शाह यांचं भाषण सुरु होतं आणि त्याच वेळेस खासदार असलेले सुजय विखे हे अमित शाहांच्या मागे उभे होते. खरं तर ते अमित शाहांना काही लागलं तर ते देता येईल म्हणून थांबले असावेत. पण भाषण सुरु झालं, कॅमेरे ऑन झाले आणि सुजय विखे हे शाहांच्या फ्रेममध्ये ठळकपणे दिसायला लागले. थोडा वेळ गेल्यानंतर अमित शाहांचा सुरक्षा अधिकारी सुजय विखेंजवळ गेला आणि त्यानं सुजय विखेंच्या कानात काही तरी सुचना दिली. त्यानंतर सुजय विखे लगेच बाजूला गेले. ही सगळी घटना कॅमेऱ्यात कैद झाली. विखेंना बाजूला जायलाच सुरक्षा अधिकाऱ्यानं सांगितलं असा अंदाज व्यक्त केला गेला. चर्चा सुरु झाली. कदाचित सुजय विखे जिथं थांबले होते, ते तिथं लावलेल्या कुलरच्या आडही येत होते. त्यामुळेही कदाचित त्यांना बाजुला व्हायला सांगितलं असावं असं दिसतंय.

मोदींच्या सभेवेळी काय घडलं? हा पहिलाच प्रसंग नाहीय की जेव्हा सुजय विखेंना असं कॅमेऱ्यातून बाजुला काढलं असेल. असाच त्यांचा दुसरा एक प्रसंग चर्चेत राहिला आणि तो होता खुद्द पंतप्रधान मोदींच्या सभेवेळचा. दोन वर्षापूर्वीची ही घटना आहे. तारीख सांगायची झाली तर 14 एप्रिल 2019 ची. महाराष्ट्रात त्यावेळेस लोकसभेच्या निवडणुका लागलेल्या होत्या. त्यातल्या एका प्रचारसभेसाठी नरेंद्र मोदी हे अहमदनगरला आले होते. म्हणजेच सुजय विखेंच्या प्रचाराची ती सभा होती. त्यावेळेस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. व्यासपीठावर मोदी दाखल झाले आणि सर्वांना नमस्कार करत ते पुढं चालू लागले. तेवढ्यात सुजय विखे धावत मोदींच्या जवळ गेले. ते काही तरी मोदींना दाखवायचे प्रयत्न करत होते पण मोदींनी त्यांच्याकडं बघितलं आणि त्यांना काय चुकलं ते समजलं. फडणवीसांच्याही ते लक्षात आलं. सुजय विखे नेमके मोदी आणि कॅमेरा ह्या दोघांच्या मधात आले होते. फडणवीसांनी प्रसंगावधान दाखवत सुजय विखेंना आधी हाताला धरुन मागे सारलं आणि नंतर त्यांची मोदींशी ओळख करुन दिली. लगेचच फडणवीसांनी शिर्डीचे शिवसेना उमेदवार सदाशिव लोखंडेंचीही ओळख करुन दिली. मोदींनीही आधी सुजय विखे आणि नंतर लोखंडेंशी हस्तांदोलन करत दोघांचीही ओळख करुन घेतली. सुजय विखे मदतीसाठी म्हणून धावले पण मोदी त्यांना ओळखतच नव्हते, त्यातून प्रसंग घडला असावा. पण त्याचवेळेस फडणवीसांनी दाखवलेलं प्रसंगावधान महत्वाचं ठरलं. हा खरं तर योगायोगच म्हणावा लागेल की, सुजय विखे आधी मोदी आणि आता अमित शाह यांच्या कॅमेऱ्यात आले आणि नंतर त्यांना सावरावं लागलं.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.