Ganeshotsav 2021 | गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा, मध्य रेल्वेकडून विशेष गाड्या, 8 जुलैपासून बुकिंग

कोकणात गणपतीसाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वेने 72 गणपती स्पेशल ट्रेन सोडल्या आहेत. या गाडय़ांचे बुकिंग गुरुवार 8 जुलैला सकाळी आठ वाजल्यापासून सुरू होणार आहे.

Ganeshotsav 2021 | गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा, मध्य रेल्वेकडून विशेष गाड्या, 8 जुलैपासून बुकिंग
कोकण रेल्वे
Follow us
| Updated on: Jul 06, 2021 | 10:21 AM

मुंबई : कोकणातील गणेशोत्सव हा परंपरा आणि संस्कृतीसाठी ओळखला जातो. गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवावर कोरोनाचं सावट आहे. पण असे असले तरीही कोकणात गणपतीचा उत्साह शिगेला पोहचला आहे. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने कोकण मार्गावर गणपती स्पेशल गाडय़ा सोडल्या जाणार आहे. येत्या 8 जुलैपासून या गाड्यांचे बुकींग सुरु होणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा मिळाला आहे. (Central Railway to run 72 Ganpati special trains from Mumbai to konkan booking starts from 8 july)

8 जुलैपासून बुकिंग सुरु

कोकणात गणपतीसाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वेने 72 गणपती स्पेशल ट्रेन सोडल्या आहेत. संपूर्ण आरक्षित असलेल्या या गाडय़ांचे बुकिंग गुरुवार 8 जुलैला सकाळी आठ वाजल्यापासून सुरू होणार आहे. या ट्रेन सीएसएमटी-पनवेल आणि सावंतवाडी रोड, रत्नागिरीदरम्यान चालविण्यात येणार आहेत. यात कोरोना आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जाणार आहे.

?सीएसएमटी ते सावंतवाडी रोड – दैनिक स्पेशल (36 फेऱ्या)

ट्रेन क्र. 01227 : ही ट्रेन दररोज 5 ते 22 सप्टेंबरदरम्यान दररोज सीएसएमटीहून रात्री 12.20 वा. सुटेल. तर दुपारी 2.00 वा. सावंतवाडी रोडला पोहोचेल.

ट्रेन क्र. 01228 : ही परतीच्या प्रवासाची ट्रेन 5 ते 22 सप्टेंबरदरम्यान दररोज सावंतवाडीहून दु. 2.40 वा सुटेल. तर सीएसएमटीला पहाटे 4.35 वा. पोहोचेल.

कुठे कुठे थांबणार – दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, नांदगाव रोड, सिंधुदुर्ग आणि कुडाळ

?सीएसएमटी ते रत्नागिरी – द्विसाप्ताहिक (10 फेऱ्या)

ट्रेन क्र. 01229 : ही ट्रेन 6 ते 20 सप्टेंबरदरम्यान आठवडय़ातून दोनदा धावेल. सोमवार आणि शुक्रवार सीएसएमटीहून दुपारी 1.10 वाजता सुटेल. तर रत्नागिरीला रात्री 10.35 वा. पोहोचेल.

ट्रेन क्र. 01230 : ही परतीची ट्रेन 6 ते 20 सप्टेंबरदरम्यान आठवडय़ातून दोनदा रविवार आणि गुरुवार धावणार आहे. ही ट्रेन रत्नागिरीहून रात्री 11.30 वाजता सुटेल. तर सीएसएमटीला सकाळी 8.20 वाजता पोहोचेल.

कुठे कुठे थांबणार : दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी

?पनवेल ते सावंतवाडी रोड – त्रैसाप्ताहिक (16 फेऱ्या)

ट्रेन क्र. 01231 : ही ट्रेन 7 ते 22 सप्टेंबरदरम्यान आठवडय़ातून तीनदा मंगळवार, बुधवार आणि शनिवारी असेल. ही ट्रेन पनवेलहून सकाळी 8.00 वाजता सुटून सावंतवाडीला रात्री 8.00 वा. पोहचेल.

ट्रेन क्र. 01232 : ही परतीची ट्रेन 7 ते 22 सप्टेंबरदरम्यान आठवडय़ातून तीनदा मंगळवार, बुधवार आणि शनिवारी सुटेल. तर सावंतवाडीहून रा. 8.45 वा. सुटून पनवेलला स. 7.10 वा. पोहचेल.

कुठे कुठे थांबणार : रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, नांदगाव रोड, सिंधुदुर्ग आणि कुडाळ

?पनवेल ते रत्नागिरी – द्विसाप्ताहिक स्पेशल (10 फेऱ्या)

ट्रेन क्र.01233 : ही ट्रेन 9 ते 23 सप्टेंबरदरम्यान आठवडय़ातून दोनदा गुरुवार आणि रविवारी धावेल. तर पनवेलहून स. 8.00 वा. सुटून रत्नागिरीला दु. 3.40 वा. पोहोचेल.

ट्रेन क्र. 01234 : ही परतीची ट्रेन 6 ते 20 सप्टेंबरदरम्यान आठवडय़ातून दोनदा सोमवारी आणि शुक्रवारी असेल. ही ट्रेन रत्नागिरीहून रा. 11.30 वाजता सुटून पनवेलला स. 6.00 वा. पोहचेल.

कुठे कुठे थांबणार : रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड

10 सप्टेंबरला गणरायाचे आगमन

यंदा 10 सप्टेंबरला गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. गणेशोत्सव हा कोकणातील सांस्कृतिक जीवनशैलीचा प्रमुख भाग आहे. कोकणातील प्रत्येक घरात गणपती बसवला जात असल्याने या काळात शहरातील लोक आपापल्या गावी जातात. मात्र, कोरोनामुळे गेल्यावर्षी या प्रथेत खंड पडला होता.

गतवर्षीपेक्षा यंदा कोरोनाचे संकट अधिक गडद आहे. सध्याच्या घडीला रत्नागिरी जिल्हा हा राज्यातील कोरोनाच्या प्रमुख हॉटस्पॉटपैकी एक आहे. त्यामुळे आता रत्नागिरीत आरोग्य यंत्रणांकडून रुग्णांच्या ट्रेसिंगवर भर दिला जात आहे. तरीही गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांना गावची ओढ़ लागली आहे. कोकण रेल्वेने आतापर्यंत जाहीर केलेल्या गाड्यांचे गणेशोत्सवासाठीचे आरक्षण फुल्ल झाले आहे.

(Central Railway to run 72 Ganpati special trains from Mumbai to konkan booking starts from 8 july)

संबंधित बातम्या : 

चाकरमान्यांना लागले गणेशोत्सवाचे वेध; कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्यांचे आरक्षण फुल्ल

रत्नागिरीत लॉकडाऊन अयशस्वी, पॉझिटिव्हीटी दरात दुसऱ्या स्थानी, मृत्यूदरामुळं टेन्शन वाढलं

गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोल माफ : चंद्रकांत पाटील

'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर.
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?.
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी.
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?.
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?.