मोफत लस आणि अन्नधान्य देण्याचा केंद्राचा निर्णय स्वागतार्ह, ठाकरे सरकारने पंतप्रधानांचा आदर्श घ्यावा; रामदास आठवलेंचा टोला

18 वर्षांवरील सर्वांना मोफत लस देण्याचा आणि 80 कोटी गरिबांना मोफत अन्नधान्य देण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा निर्णय स्वागतार्ह असल्याचे मत रामदास आठवले यांनी मांडले आहे.

मोफत लस आणि अन्नधान्य देण्याचा केंद्राचा निर्णय स्वागतार्ह, ठाकरे सरकारने पंतप्रधानांचा आदर्श घ्यावा; रामदास आठवलेंचा टोला
Ramdas Athavale
Follow us
| Updated on: Jun 08, 2021 | 4:43 PM

मुंबई : 18 वर्षांवरील सर्वांना कोरोना प्रतिबंधक लस मोफत देण्याचा आणि पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेतून देशभरातील 80 कोटी नागरिकांना येत्या दिवाळीपर्यंत प्रत्येकी 5 किलो अन्नधान्य मोफत देण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. पंतप्रधानांचा हा निर्णय स्वागतार्ह आहे, असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. तसेच पंतप्रधानांचा आदर्श घेऊन महाविकास आघाडीनेही राज्यातील गरिबांना भरघोस मदत करावी, असे आवाहनही आठवले यांनी केले आहे. (Centre decision to provide free vaccines and foodgrains is welcome, Thackeray government should follow PMs example : Ramdas Athavale)

यापूर्वी मे-जून महिन्यात पी. एम. गरीब कल्याण अन्न योजनेतून अन्नधान्य गरिबांना देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता जून महिन्याच्या पुढे दिवाळीपर्यंत या योजनेचा विस्तार केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गरीब कल्याण दृष्टीचे आम्ही मनःपूर्वक अभिनंदन करीत आहोत, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार केंद्र सरकारवर सतत टीका करीत होते, मात्र मोफत लस देण्याचा आणि गरिबांना अन्नधान्य वाटपाचा निर्णय पंतप्रधानांनी घेतला असल्यामुळे महाविकास आघाडीचे तोंड बंद झाले आहे, असा टोला आठवले यांनी लगावला.

महाविकास आघाडीने पंतप्रधानांचा आदर्श घ्यावा

महाराष्ट्रात मात्र शिवभोजन योजनेव्यतिरिक्त गरीब गरजूंना कोणतीही मदत अद्याप राज्य शासनाद्वारे मिळालेली नाही. राज्यातील कलावंत, शाहीर, गायक, तमाशा कलावंत हालअपेष्टा काढत आहेत. त्यांना राज्य सरकारने तातडीने आर्थिक मदत केली पाहिजे. मागील वर्षाभरापासून राज्य शासनाने कोरोनाच्या संकटकाळात लॉकडाऊनच्या बिकट दिवसांत गरिबांना कोणतीही आर्थिक मदत दिली नाही. राज्यातील गरीब गरजूंना राज्य सरकारने त्वरित आर्थिक मदत दिली पाहिजे. महाविकास आघाडी सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आदर्श घेऊन राज्यातील गरिबांना भरीव मदतीचे त्वरित वाटप करावे, असे आवाहन आठवले यांनी केले आहे.

आठवलेंकडून मोदींचे कौतुक

देशात कोरोनाचा प्रसार वाढत आहे. महाराष्ट्रात तर मोठया प्रमाणात कोरोनाचा कहर वाढला आहे. महाराष्ट्राप्रमाणे अन्य राज्यात कडक निर्बंध लागले आहेत. लॉकडाऊन लावण्यात आला आहे. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या गरिबांना मोलमजुरी मिळत नाही. रोजगार बुडाला आहे. त्यामुळे गरिबांच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न आहे. गरिबांचे हे दुःख ओळखून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गरीब कल्याण अन्नयोजनेद्वारे देशभरातील 80 कोटी गरिबांना दिवाळीपर्यंत प्रत्येकी 5 किलो अन्नधान्य मोफत देण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत योग्य आणि गरिबांप्रती त्यांची कटीबद्धता दाखवणारा निर्णय आहे, अशा शब्दात आठवले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.

संबंधित बातम्या

PM Narendra Modi speech highlights : सर्वांना मोफत लस, दिवाळीपर्यंत 80 कोटी जनतेला मोफत धान्य!

PM Narendra Modi: केंद्राकडून राज्यांना मोफत लस पुरवठा, पीएम गरीब कल्याण योजनेस मुदतवाढ, नरेंद्र मोदींच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

(Centre decision to provide free vaccines and foodgrains is welcome, Thackeray government should follow PMs example : Ramdas Athavale)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.