आजीबाई कचरा टाकण्यासाठी घराबाहेर पडली, रस्त्यात चोरट्यांनी गळ्यातील चैन खेचली, थरार सीसीटीव्हीत कैद

75 वर्षीय आजीबाईच्या गळ्यातून चैन हिसकावून चोरटे पसार झाले. या घटनेत आजीबाई चोरट्यांमुळे रस्त्यावर पडली (Chain snatching in Kalyan).

आजीबाई कचरा टाकण्यासाठी घराबाहेर पडली, रस्त्यात चोरट्यांनी गळ्यातील चैन खेचली, थरार सीसीटीव्हीत कैद
Follow us
| Updated on: Dec 12, 2020 | 7:28 PM

ठाणे : कल्याणमध्ये भर दिवसा एका ज्वेलर्स दुकानावार दरोडा पडल्याची घटना ताजी असतानाच चैन स्नॅचिंगची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे या चैन स्नॅचिंगचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. 75 वर्षीय आजीबाईच्या गळ्यातून चैन हिसकावून चोरटे पसार झाले. या घटनेत आजीबाई चोरट्यांमुळे रस्त्यावर पडली. तिच्या पायाला आणि गळ्याला दुखापत झाली आहे (Chain snatching in Kalyan).

कल्याण पूर्वेतील श्रीकृष्णनगर परिसरात राहणाऱ्या 75 वर्षीय आजी चंद्रप्रभा पिळणकर या शनिवारी (12 डिसेंबर) सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास कचरा टाकण्यासाठी घराबाहेर पडल्या. रस्त्यावर कचरा टाकून घरी परत येत असताना दोन बाईकस्वार चोरटे आजीबाईंच्या दिशेने आले. त्यांनी आजीबाईच्या गळ्यातील पावणे दोन तोळ्यांची चैन हिसकावून पळ काढला (Chain snatching in Kalyan).

चोरट्यांनी जोरदार धक्का दिल्याने आजी भर रस्त्यात खाली पडल्या. त्यांच्या गळाला आणि पायाला दुखापत झाली आहे. काही जणांनी ही घटना पाहून चोरट्यांचा पाठलाग केला. मात्र चोरट्यांनी धूम ठोकली. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या परिसरात अशाप्रकारेच्या अन्य दोन घटनादेखील घडल्या आहेत. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन त्वरीत आरोपींना अटक करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. या प्रकरणात टिळकनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.

कल्याणमध्ये गेल्या महिन्यात भरदिवसा दुपारी तीन वाजेच्या सुमारास ज्वेलर्सच्या दुकानात दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना घडली होती. चोरट्यांनी धारधार शस्त्राने ज्वेलर्सचे मालक आणि कर्मचाऱ्याला जखमी केले होते. ज्वेलर्समधील कर्मचाऱ्याने जखमी अवस्थेत एका चोरट्याला पकडलं होतं. तर दोन चोरटे 30 तोळे सोने आणि दीड लाखांची रोकड घेऊन पसार झाले होते. या घटनेनंतर कल्याणमध्ये आज चैन स्नॅचिंगची घटना समोर आली आहे.

संबंधित बातम्या :

रस्त्याने बोलत जाणाऱ्यांचे मोबाईल पळवायचे, सोलापूर पोलिसांकडून तीन आरोपींना बेड्या

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.