Nashik weather:नाशिक जिल्ह्यात आज जोरदार, खान्देशमध्येही लावणार हजेरी

नाशिक जिल्हा आणि खान्देशात (Nashik district) आज, उद्या जोरदार पावसाची (heavy rain) शक्यता वर्तवण्यात आली आहे. जिल्ह्यातील धरणे भरत आल्याने गोदावरी नदीला (Godavari) केव्हाही पूर येण्याची शक्यता आहे.

Nashik weather:नाशिक जिल्ह्यात आज जोरदार, खान्देशमध्येही लावणार हजेरी
नाशिकमध्ये सकाळपासून रिमझिम.
Follow us
| Updated on: Sep 13, 2021 | 11:18 AM

नाशिकः नाशिक जिल्हा आणि खान्देशात (Nashik district) आज, उद्या जोरदार पावसाची (heavy rain) शक्यता वर्तवण्यात आली आहे. जिल्ह्यातील धरणे भरत आल्याने गोदावरी नदीला (Godavari) केव्हाही पूर येण्याची शक्यता आहे. (Chance of heavy rain in Nashik district and Khandesh)

सध्या मान्सूनचा आस असलेले कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे. दक्षिण ते पश्चिमेपर्यंत दाब कमी आहे. त्यामुळे पावसाला पोषक वातावरण आहे. त्यामुळे राज्यभर जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यात मराठवाडा वगळता बहुतेक ठिकाणी पावसाचा जोर कमी तर मध्य महाराष्ट्र, कोकणात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यात सोमवार (13 सप्टेंबर) आणि मंगळवारी (14 सप्टेंबर) जोरदार पावसाची शक्यता आहे. विशेषतः कळवण, सटाणा, मालेगाव आणि देवळा तालुक्यात पावसाचा जोर वाढणार आहे. सोबतच खान्देशमध्येही पावसाचे प्रमाण जास्त राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आगामी दोन दिवसांत विदर्भासह नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, रविवारी (12 सप्टेंबर) दिवसभरही नाशिक जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. नाशिकमध्ये सकाळपासून भुरभुर पाऊस सुरू होता. दुपारी आणि रात्री पावसाचा जोर वाढला होता. सोमवारी सकाळपासूनही पाऊस सुरू आहे.

नाशिकला पुराची शक्यता

नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. विशेषतः धरण क्षेत्रात तुफान पाऊस सुरू आहे. गंगापूर धरणाची पाणी पातळी 96.82 तर दारणा धरणाची पाणी पातळी 97.10 वर पोहचली आहे. त्यामुळे या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. गंगापूर धरणातून सोमवारी (13 सप्टेंबर) सकाळी नऊ वाजता 2500 क्यसेक्स पाणी सोडण्यात आले आहे. जिल्ह्यातील धरणे भरत आल्याने गोदावरीला केव्हाही पूर येण्याची शक्यता आहे.

प्रशासन झाले दक्ष

गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच आहे. धरण भरत आले आहे. त्यामुळे गोदावरीला केव्हाही पूर येऊ शकतो. हे लक्षात घेता गोदाघाट परिसरातील, रामकुंड येथील दुकाने हलविण्यात आली आहेत. नागरिकांना नदीकाठी येऊ नये, अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. मात्र, तरीही अनेक मुले गोदाकाठी पोहण्यासाठी येत आहेत. या मुलांना वेळीच आवर घालण्याची गरज आहे. अन्यथा या ठिकाणी एखादी दुर्घटना घडू शकते. (Chance of heavy rain in Nashik district and Khandesh)

इतर बातम्याः 

NashikFlood:वालदेवीला पूर, एक जण गेला वाहून, गोदाकाठच्या नागरिकांना दक्षतेचा इशारा

बरसो रे मेघा मेघा…नाशिक, जळगावकरांना सुखवार्ता; धरणे काठोकाठ भरली!

गुन्हेगारांच्या नाड्या आवळणारे पोलीस अधीक्षक पाटील यांच्यासाठी नाशिककर एकवटले

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.