नाशिक जिल्ह्यात आज मुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज

| Updated on: Oct 12, 2021 | 2:40 PM

नाशिक जिल्ह्यात आज आणि उद्या मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. सोबतच उत्तर महाराष्ट्रात 19 आणि 20 ऑक्टोबर रोजी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.

नाशिक जिल्ह्यात आज मुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज
Follow us on

नाशिकः नाशिक जिल्ह्यात आज आणि उद्या मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. सोबतच उत्तर महाराष्ट्रात 19 आणि 20 ऑक्टोबर रोजी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.

गेल्या दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात पावसाचे थैमान सुरू आहे. त्यामुळे द्राक्षबागा, कांदा, सोयाबीनचा चिखल झाला आहे. त्यातच आज सोमवारपासून राज्यात मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. या काळात पुढील दोन दिवसांसाठी नाशिक, अहमदनगर, पुणे, ठाणे, मुंबई, पालघर, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. मुंबईचे वरिष्ठ शास्त्रज्ञ के. एस. होसलीकर यांनी ट्विट करून ही माहिती दिली. मात्र, मध्य व दक्षिण भारतात मान्सून आणखी काही दिवस सक्रिय राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात पुन्हा 19 आणि 20 ऑक्टोबर रोजी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जवळपास 25 ऑक्टोबर नंतर पावसाळी वातावरण हटण्याचा अंदाज आहे. नाशिक जिल्ह्याकडे यंदा सुरुवातीच्या काळात पावसाने पाठ फिरवली. त्यामुळे धरणे तळाला गेली. शेतकऱ्यांसमोर संकट उभे राहिले. मात्र, सप्टेंबर महिन्यात लावलेल्या जोरदार हजेरीने त्याने सारी कसर भरून काढली. मनमाड, नांदगाव परिसरात दोन दोनदा ढगफुटी सदृश अतिवृष्टी झाली. यंदा नाशिकमध्ये गोदावरी नदीला पूर चार वेळेस पूर आला.

नाशिकला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण भरले आहे. गंगापूर धरण समूहात गंगापूर (मोठे), काश्यपी (मध्यम), गौतमी गौदावरी (मध्यम) आणि आळंदी (मध्यम) ही चार धरणे आहेत. यातील सारीच धरणे भरली आहेत. त्यामुळे यंदा नाशिककरांची पाणी चिंता मिटली आहे. दुसरीकडे मुंबईला पाणीपुरवठा करणारे इगतपुरी तालुक्यातील सर्वात महत्त्वाचे अप्पर वैतरणा धरण भरले आहे. त्यामुळे तूर्तास मुंबईकरांचाही पाणीप्रश्न मिटला आहे. वैतरणा धरण गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये भरले होते. यावर्षी त्याला भरण्यासाठी एक महिन्याचा उशीर लागला.

जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून वीजेचे तांडव सुरू आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार वादळी पाऊस होत आहे. शनिवारी दुपारीही शिरवाडे वणी परिसरात वादळी पावसाला सुरुवात झाली. त्यात विभा गुरव या शेतात काम करत होत्या. यावेळी अचानक वीज कोसळल्याने विभा यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी त्र्यंबक तालुक्यात तीन वेगवेगळ्या ठिकाणी वीज पडली. त्यात पहिल्या घटनेत चंद्राची मेट येथे रामू रामचंद्र चंद्रे हे तरुण शेतकरी (वय 38) रानात गुरे चारत होते. दुपारी त्यांच्या अंगावर वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

इतर बातम्याः

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहांच्या नावे सिन्नरमध्ये अफाट ‘माया’; पुनुमिया पिता-पुत्राच्या नावे खरेदी, नाशिक पोलिसांकडून तपास सुरू

अपार्टमेंटमध्ये नागोबा डोलाया लागला, हजार रुपयांसाठी ‘कोब्रा’ अडकावला दारावर; नाशिकमध्ये सर्पमित्राची नसती उठाठेव