AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धारावीसाठी आरएसएस स्वयंसेवकांनी जीव धोक्यात घातला : चंद्रकांत पाटील

धारावीत आरएसएस स्वयंसेवकांनी जीव धोक्यात घालून स्क्रीनिंग केल्याचा दावाही चंद्रकांत पाटील यांनी केला (Chandrakant Patil on Dharavi Corona prevention RSS).

धारावीसाठी आरएसएस स्वयंसेवकांनी जीव धोक्यात घातला : चंद्रकांत पाटील
Follow us
| Updated on: Jul 12, 2020 | 1:30 PM

कोल्हापूर : धारावीत झालेल्या कोरोना नियंत्रणाचं सगळं श्रेय सरकारने घेण्याची गरज नाही, असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सरकारला लक्ष्य केलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) स्वयंसेवकांनी जीव धोक्यात घालून प्रत्येक घरात जाऊन स्क्रीनिंग केल्याचा दावाही चंद्रकांत पाटील यांनी केला (Chandrakant Patil on Dharavi Corona prevention RSS). तसेच सरकारने कोरोना काळात भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोपही चंद्रकांत पाटील यांनी केला. ते कोल्हापुरात बोलत होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले, “धारावीत सरकारने चांगलं काम केलं तर त्याचं कौतुकच आहे. मात्र, धारावीतील परिणाम सरकारने काम केल्याने झालं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जीव धोक्यात घालून स्क्रिनिंग केलं. प्रत्येक घरात जाऊन प्रत्येक सदस्याची तापमान, ऑक्सिजन, सॅच्युरेशन तपासणी केली. जे संशयास्पद वाटलं ते महानगरपालिकेला सांगितलं. त्यांनी हे काम नगरपालिकेच्या मदतीनेच केलं. पण हे सर्व श्रेय सरकारचं बनण्याचं कारण नाही.”

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

“मुंबईत कोरोना नियंत्रणात आला तर आम्हाला आनंदच आहे. मात्र, कोरोनावर नियंत्रण आणलं म्हणून भ्रष्टाचारावर बोलायचं नाही का? कोरोनाच्या कामाचं अभिनंदन करताना ते करताना मागे जो भ्रष्टाचार झाला त्याचेही विषय काढू. वांद्रे येथे 27 कोटी रुपयांचं तात्पुरतं कोविड सेंटर का बांधलं? त्याच्यासमोर रिलायन्सचा 3100 बेड बसतील इतका मोठा हॉल होता. 27 कोटी खर्च करुन तर 1100 बसले. हे मुद्दे उपस्थित करावे लागतील,” असंही चंद्रकांत पाटील यांनी नमूद केलं.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

चौदाव्या वित्त आयोगातील शिल्लक निधीचे व्याज ग्राहकास विभागाकडून जमा करण्याचा काढलेला फतवा चुकीचा असल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं. वित्त आयोगाचे पैसे केंद्रानं ग्रामपंचायतींना दिले ते राज्य सरकार कसे काय वापरु शकतं, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. वित्त आयोगाने तयार केलेल्या प्रस्तावावर ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सत्कार करुन घेतला. यात त्यांचे काहीही श्रेय नसल्याचं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी मुश्रीफ यांच्यावर टीका केली.

“कार्यकर्त्यांची सोय लावण्यासाठीच 15 टक्के कर्मचाऱ्यांच्या बदल्या, कोविड सेंटरमधील थाळीतही भ्रष्टाचार”

कोरोना काळात सुरु असलेल्या बदल्यांच्या निर्णयावर चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केलं. कार्यकर्त्यांची सोय लावण्यासाठीच 15 टक्के कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला. चंद्रकांत पाटील म्हणाले, “कोरोना विरुद्ध लढाई करताना सरकारने भ्रष्टाचार केला. कोरोना संपल्यावर हे सगळे विषय विधानसभेत मांडणार आहे. चुकीच्या गोष्टींवर टीका करायची नाही का? या सगळ्यावर आज मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे. 5 रुपयांची शिवभोजन थाळी केअर सेंटरमध्ये 380 रुपयाला कशी? ही कंत्राटं कोणा कोणाला देण्यात आली? कोरोना संपल्यानंतर हे सगळे विषय विधानसभेत काढणार आहे.”

हेही वाचा :

कोरोना संपल्यावर मनमानी करा, पुणे पालिका आयुक्तांच्या बदलीवरुन गिरीश बापटांचा अजित पवारांना टोला

राजभवनातील 100 पैकी 14 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण, 60 जणांच्या रिपोर्टची प्रतीक्षा

Rajasthan Politics | राजस्थानमध्ये राजकारण तापले, गेहलोत यांचा भाजपवर घोडेबाजाराचा आरोप, पायलट दिल्लीत

Chandrakant Patil on Dharavi Corona prevention RSS

भारताकडून हल्ल्याच्या भीतीने धूम ठोकलेल्या असीम मुनीरची पोकळ धमकी
भारताकडून हल्ल्याच्या भीतीने धूम ठोकलेल्या असीम मुनीरची पोकळ धमकी.
...तर 15 एप्रिललाच पहलगामवर झाला असता हल्ला पण... खळबळजनक माहिती समोर
...तर 15 एप्रिललाच पहलगामवर झाला असता हल्ला पण... खळबळजनक माहिती समोर.
जम्मू आणि काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी
जम्मू आणि काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी.
मी शेतकरी कर्ज माफीचं आश्वासन मी दिलं नाही - उपमुख्यमंत्री अजित पवार
मी शेतकरी कर्ज माफीचं आश्वासन मी दिलं नाही - उपमुख्यमंत्री अजित पवार.
युद्धाच्या भीतीनं पाकची झोप उडाली, लोक उपाशी राहू नये म्हणून एकच आदेश
युद्धाच्या भीतीनं पाकची झोप उडाली, लोक उपाशी राहू नये म्हणून एकच आदेश.
'93 हजार पाक सैनिकांचे आत्मसमर्पण...', धवननंतर आफ्रिदीला कुणी सुनावलं?
'93 हजार पाक सैनिकांचे आत्मसमर्पण...', धवननंतर आफ्रिदीला कुणी सुनावलं?.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचं रिक्रिएशन; NIA चं पथक बैसरन खोऱ्यात दाखल
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचं रिक्रिएशन; NIA चं पथक बैसरन खोऱ्यात दाखल.
एनआयएचे डिजी सदानंद दातेंच्या महत्वाच्या बैठका सुरू
एनआयएचे डिजी सदानंद दातेंच्या महत्वाच्या बैठका सुरू.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या बड्या मंत्र्यानं म्हटलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या बड्या मंत्र्यानं म्हटलं.
दहशतवाद्यांना गोळ्या घातल्या पाहिजेत - मनोज जरांगे
दहशतवाद्यांना गोळ्या घातल्या पाहिजेत - मनोज जरांगे.