Maratha Reservation : अशोक चव्हाण की उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याचा विषय आता नाही : चंद्रकात पाटील
कोल्हापूर : मराठा आरक्षणावरील सुनावणी लांबणीवर पडण्यासाठी सरकारची बेपर्वाई कारणीभूत असल्याचे सांगत चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अशोक चव्हाण यांना फटकारले. आता उद्धव ठाकरे किंवा अशोक चव्हाण यांचा राजीनामा घेऊन काही साध्य होणार नाही. आम्हाला याप्रकरणात राजकारण करायचे नाही. परंतु, आजच्या सुनावणीवेळी घडलेल्या प्रकारावरून राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत गंभीर नसल्याचे आणि बेपर्वाई करत […]
कोल्हापूर : मराठा आरक्षणावरील सुनावणी लांबणीवर पडण्यासाठी सरकारची बेपर्वाई कारणीभूत असल्याचे सांगत चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अशोक चव्हाण यांना फटकारले. आता उद्धव ठाकरे किंवा अशोक चव्हाण यांचा राजीनामा घेऊन काही साध्य होणार नाही. आम्हाला याप्रकरणात राजकारण करायचे नाही. परंतु, आजच्या सुनावणीवेळी घडलेल्या प्रकारावरून राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत गंभीर नसल्याचे आणि बेपर्वाई करत असल्याचे स्पष्ट झाल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला. (Chandrakant patil criticized on Thackeray government for Maratha reservation supreme court)
कोल्हापूरमध्ये चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकारवर टीका केली आहे. मराठा आरक्षण याचिकेवर आज काहीच करू शकत नाही. तुम्ही घटनापीठासमोर जा, असं सांगत सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण याचिकेवरील सुनावणी 4 आठवड्यासाठी पुढे ढकलली आहे. यामुळे मराठा समाजामध्ये संतापाची लाट उसळली असून विरोधकांनीही सरकारला धारेवर धरलं आहे. याच मुद्द्यावर ‘मराठा आरक्षणाच्या बाबतीत आज सुप्रीम कोर्टात जे झालं त्यावर हे सरकारला आरक्षण देण्यात रस नाही. याला सरकारची बेपर्वाई आहे असं म्हणायला लागेल’ अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
खडसेंच्या पक्षांतरानंतर गिरीश महाजन अॅक्टिव्ह, रक्षा खडसेंच्या गैरहजेरीवर पहिली कमेंट
मराठा आरक्षणाला 9 सप्टेंबरला स्टे मिळाला होता. या नंतर 47 दिवसात सरकारकडून आरक्षणासाठी झालेले प्रयत्न हे संशयास्पद आहे. स्थगिती देणाऱ्या खंडपीठासमोर आजची सुनावणी करणं शक्य नाही हे आज तुम्हाला सुचलं का? पाच न्यायायाधीशांकडे जाणारी केस पूर्ण मेरिटवर ऐकली जाईल. फक्त स्थगिती उठवण्याबाबत सुनावणी होणार नाही असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
ते पुढे म्हणाले की, ‘महाराष्ट्र सरकारचा वकील उपस्थित नाही. तुम्हाला वेळेवर जाता येत नाही. सरकारच्या वेगवेगळ्या वकिलामध्ये समन्वय नाही. सुनावणी आधी मंत्र्यानी दिल्लीत जाऊन पूर्वतयारी करायला हवी होती. त्यामुळे सरकारला आरक्षण द्यायचं आहे की नाही असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला. सरकारमुळे सगळ्या ऍडमिशन थांबल्या आहेत. आता एक महिना सगळं शांत असेल. शैक्षणिक क्षेत्रात गोंधळ निर्माण झाला आहे. पण या विषयात सरकार गंभीर नाही अशा शब्दात चंद्रकांत पाटलांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. (Chandrakant patil criticized on Thackeray government for Maratha reservation supreme court)
सुरवातीपासून सरकारने सुनावणीपासून पळ काढण्याच्या प्रयत्न केला. या विषयात सरकारला गांभीर्य नाही. अशा सरकारचा मी निषेध करतो. दसरा मेळाव्यात आरक्षण द्यालया बांधील आहोत असं संगीतल. अरे बाबा पण फक्त अस फक्त बोलून चालत नाही, अशी थेट टीका उद्धव ठाकरेंवर चंद्रकांती पाटलांनी केली आहे.
चंद्रकांत पाटलांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे – आम्हाला यात राजकारण करायचं नाही. पण महाराष्ट्र वेठीला धरला गेला आहे. – सरकार या विषयात गंभीर होणार की नाही? – अशोक चव्हाणांचा राजीनामा घ्यायचा की ठाकरेंचा राजीनामा घ्यायचा हा विषय आता नाही? – भारतीय जनता पार्टीचं सरकार असेपर्यंत स्टे मिळू दिला नाही – लास्ट इअर परीक्षा घेणं म्हणजे औपचारिकता पूर्ण केली जात आहे – युवराजांना हायकोर्टात फटकरल्यानं ही परीक्षा घेतली जात आहे. – दसरा मेळाव्याच भाषण म्हणजे शिमग्याचं भाषण – काय तुमची भाषा आहे याचा विचार केला पाहिजे – महाराष्ट्रातील कोणत्याच विषयावर बोलला नाही – भाषणाचा एकच मुद्दा होता – हम किसीं को टोकेंगे नाही. कोई टोकेगा तो झोडेंगे नहीं ही आमची भूमिका – कोण हिंदुत्ववादी आहे आणि कोण हिंदुत्ववादी असल्याचं ढोंग करतंय हे जनतेला समजतं आहे – निवडणुकीत ते दाखवून देतील
Mumbai | केंद्र सरकार नेमकं कुणासाठी काम करतं? छगन भुजबळांचा हल्लाबोल – tv9 @ChhaganCBhujbal pic.twitter.com/t0aTFtWfPw
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 27, 2020
(Chandrakant patil criticized on Thackeray government for Maratha reservation supreme court)