ऐन दिवाळीत 11 जणांचा आगीत मृत्यू, या घटनेचा जाब विचारूच, सरकारला सोडणार नाही; चंद्रकांत पाटलांचा इशारा
बरं होण्यासाठी आलेल्या 11 रुग्णांचे दिवाळीत बळी गेले आहेत. विरोधी पक्ष म्हणून आम्ही हा विषय लावून धरणार आहोत, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले. तसेच भाजप हा विषय सोडणार नाही, नेमकं काय झालं, कोणामुळे झालं हे आम्ही विचारु, असा इशारा देत त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहीज अशी मागणी केली.
पुणे : “नगरची घटना दुर्दैवी आहे. विरोधी पक्षाचा नेता म्हणून कोणीतरी ही घटना घडलवी असे मी म्हणणार नाही. बरं होण्यासाठी आलेल्या 11 रुग्णांचे दिवाळीत बळी गेले आहेत. विरोधी पक्ष म्हणून आम्ही हा विषय लावून धरणार आहोत,” असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले. तसेच भाजप हा विषय सोडणार नाही, नेमकं काय झालं, कोणामुळे झालं हे आम्ही विचारु, असा इशारा देत त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहीजे अशी मागणी केली.अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयात आगीची घटना घडली. या आगीत एकूण 11 जणांचा मृत्यू झाला. यावर बोलताना चंद्रकांत पाटील यांनी वरील वक्तव्य केलं. ते पुण्यात बोलत होते.
घटनेचा चौकशी अहवाल लोकांना समजायला हवा
“नगरची घटना दुर्दैवी आहे. विरोधी पक्षाचा नेता म्हणून कोणी तरी ती घटना घडवली, असं मी म्हणणार नाही. अशी दुर्देवी घटना घडवण्या इतकी महाराष्ट्राची संस्कृती वाईट नाही. पण घटना घडल्यानंतर दोन तीन दिवस फक्त चर्चा होते. चौकशी समिती नेमली जाते. त्या चौकशी समितीच्या अहवालाच पुढे काय होतं ? सगळ्यांनी या घटनेत मदत कार्य केलं पाहिजे. या घटनेचा चौकशी अहवाल लोकांना समजायला हवा,” असे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
आम्ही सरकारला मदत करायला तयार आहोत
तसेच “विरोधी पक्ष म्हणून आम्ही हा विषय लावून धरणार आहोत. बरं होण्यासाठी आलेल्या 11 रुग्णांचे दिवाळीत बळी गेले आहेत. भाजप हा विषय सोडणार नाही. नेमकं काय झालं, कोणामुळे झालं ? हे आम्ही विचारु,” असेदेखील ते म्हणाले. आम्ही सरकारला मदत करायला तयार आहोत. रुग्णालयात काही शिस्त लावण्याची गरज असेल तिथं मदतीला तयार आहोत, असे आश्वासनदेखील चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारला दिले.
अनिल देशमुख दोषी, म्हणून त्यांना जामीन नाही
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. न्यायालयाच्या या निर्णयावरदेखील चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केलं. “शहारुख खानच्या मुलाचा विषय असू द्या किंवा अनिल देशमुखांचा विषय असू द्या; आमचं म्हणणं हेच आहे की, सदा सर्वकाळ भाजपवर टीका टिप्पणी केली जाते. म्हणजे न्यायालयसुद्धा भाजपला सामील झालं आहे, असं तुम्हाला म्हणायचं आहे का ? न्यायालय शाहरुख खानच्या मुलाला 24 दिवस जामीन देत नाही. तसेच अनिल देशमुखांना न्यायालयीन कोठडी मिळते; याचाच अर्थ हा आहे की या केसमध्ये काही तरी दम आहे. अनिल देशमुख दोषी आहेत म्हणून त्यांचा जामीन झाला नाही. सर्व चौकशी होऊन त्यांना शासन व्हायला हवं. तरच सर्वसामान्य माणसाचा न्यायव्यवस्थेवर विश्वास बसेल, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
इतर बातम्या :
VIDEO: सुनील पाटील प्रकरणाची सीबीआय चौकशी करा, आशिष शेलार यांची मागणी