बाबा, या वयात मी इतका फिरतो तू किमान घराबाहेर पड; असं पवारांना म्हणायचं असेल: पाटील
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी सुरू केली आहे. त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे.
पुणे: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी सुरू केली आहे. त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांनी धावत प्रवास करून उपयोग नाही. त्यांनी कोरडा प्रवास करू नये. ते मुख्यमंत्री आहेत. थेट निर्णय घेऊ शकतात. शेतकऱ्यांना थेट मदत देऊ शकतात, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. बाबा, या वयात मी इतका फिरतो तू किमान घराबाहेर पड, असं कादाचित शरद पवारांना म्हणायचं असेल, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली. (chandrakant patil reaction on cm uddhav thackeray flood affected areas visit)
चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. मुख्यमंत्री हे निर्णय घेऊ शकतात. त्यांनी धावता प्रवास करण्याची गरज नाही. कोरड्या प्रवासातून काहीही निष्पन्न होणार नाही. त्यांनी शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याचा निर्णय घ्यावा. पंचनामे करण्याचीही गरज नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. प्रत्येक वेळी केंद्र केंद्र करायचं नसतं. आपत्तीच्या वेळी पहिली मदत राज्य सरकारने करायची असते. नंतर केंद्राकडे मदत मागायची असते. राज्य सरकारने आधी मदत घोषित करावी, केंद्रकडून जे मिळेल ते बोनस समजायचं, असा टोलाही त्यांनी लगावला.
‘बाबा, या वयात मी इतका फिरतो तू किमान घराबाहेर पड’
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याबद्दल माझ्या मनात कायम आदर आहे. पण त्यांना वारंवार मुख्यमंत्र्यांची भलावण करावी लागत आहे. सरकार एकत्रं चालवायचं आहे म्हणून त्यांना मुख्यमंत्र्यांची भलामण करावी लागत आहे. याचं वाईट वाटतं. बाबा, या वयात मी इतका फिरतो तू किमान घराबाहेर पड, असं कादाचित पवारांना म्हणायचं असेल, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे शेतकऱ्यांच्या बांधावर गेले आहेत. शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी ते गेले आहेत. विरोधी पक्ष म्हणून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ते शेतकऱ्यांना भेटत आहेत, असं ते म्हणाले.
सरकारच्या माध्यमातून दुर्लक्षित राहणारे जे जे घटक आहेत, या सगळ्यांच्या बाबतीत सरकारी अधिकाऱ्यांमध्ये अनास्था आहे. कारण या अधिकाऱ्यांमध्ये सेवा भावना कमी असते. ते केवळ नोकरी म्हणून काम करत असतात. त्यामुळे निधी पडून राहतो. या दुर्लक्षितपणामुळेच नोकऱ्यांमधली आरक्षण भरली जात नाहीत, असंही ते म्हणाले. (chandrakant patil reaction on cm uddhav thackeray flood affected areas visit)
संबंधित बातम्या:
फडणवीस मुख्यमंत्र्यांना म्हणाले, थिल्लरपणा शोभत नाही, आता जयंत पाटलांचं उत्तर
महिलांसाठीच्या लोकल प्रवासाबाबत भाजपचं राजकारण, सचिन सावंत यांचा गंभीर आरोप
दिवाळीत फटाक्यांवर बंदी घालावी, अंकुश काकडेंची अजित पवारांकडे मागणी