महाविकास आघाडीच्या नेत्यांना फिरणे मुश्किल करू, मलिकांच्या राजीनाम्यावरून चंद्रकांत पाटलांचा इशारा

नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजप रस्त्यावर (Bjp) उतरले आहे, तर सरकारमधील मंत्र्यांचे फिरणे मुश्कील करू असा थेट इशारा चंद्रकांत पाटलांनी (Chandrakant Patil) दिला आहे.

महाविकास आघाडीच्या नेत्यांना फिरणे मुश्किल करू, मलिकांच्या राजीनाम्यावरून चंद्रकांत पाटलांचा इशारा
चंद्रकांत पाटलांचा महाविकास आघाडीला इशाराImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Mar 09, 2022 | 7:13 PM

मुंबई : ईडीकडून नवाब मलिक (Nawab Malik) यांना अटक झाल्यानंतर नवाब मलिकांच्या राजीनाम्याच्या मागणीने आता चांगलाचो जोर धरला आहे. नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजप रस्त्यावर (Bjp) उतरले आहे, तर सरकारमधील मंत्र्यांचे फिरणे मुश्कील करू असा थेट इशारा चंद्रकांत पाटलांनी (Chandrakant Patil) दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांना दाऊद इब्राहिमसाठी मनी लाँडरिंग केल्याच्या आरोपाखाली ईडीने अटक केल्यानंतर न्यायालयाने त्यांना कोठडी सुनावली. त्यावेळी मलिक यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याचा महाविकास आघाडीचा निर्णय झाला होता. परंतु दाऊद इब्राहिमच्या दबावामुळे हा निर्णय मागे घेतला, असा गौप्यस्फोट भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक् चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी मुंबईत भाजपाच्या मोर्चाला संबोधित करताना केला. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात याच मुद्द्यावरून भाजप आणि महाविकास आघाडी आमनेसामने आले आहेत.

सरकार दाऊदच्या दबावाखाली

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी संघर्ष करेल. गावोगावी, रस्तोरस्ती भाजपा निदर्शने करेल. दाऊदला संरक्षण देणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना फिरणे मुश्किल करू आणि हा संघर्ष यशापर्यंत नेऊ असा इशारा त्यांनी दिला. ते म्हणाले की, पूजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर जनतेमध्ये संताप उसळल्यानंतर शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेतला. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील महिना शंभर कोटीच्या वसुलीबाबत सीबीआय चौकशीचा आदेश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर ताबडतोब देशमुख यांनी राजीनामा दिला. नवाब मलिक यांना न्यायालयाने ईडी कोठडीत ठेवण्याचा आदेश दिल्यानंतर त्यांच्याही राजीनाम्याचा निर्णय आघाडीच्या प्रमुखांनी घेतला होता. पण नंतर दाऊदचा असा दबाव आला की राजीनाम्याचा निर्णय मागे घेण्यात आला. दाऊदच्या दबावाखाली काम करणाऱ्या सरकारला हटविण्यासाठी भाजपा रस्त्यावर उतरली आहे, असेही ते म्हणाले आहेत.

सरकारला शेतकऱ्यांची चिंता नाही

महाविकास आघाडी सरकारला शेतकऱ्यांची चिंता नाही. त्यांची विजेची कनेक्शन कापली जात आहेत आणि पिके पाण्याअभावी जळत आहेत. पण दाऊदला संरक्षण देण्यासाठी आणि त्याला मदत करणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी हे सरकार धडपडत आहे. त्यांना शेतकऱ्यांना नाही पण नवाब मलिक यांना वाचवायचे आहे. असा आरोपही चंद्रकांत पाटलांनी केला आहे. आज दिवसभर भाजपने मोर्चे काढत याच मुद्द्यावरून राज्यभर रान पेटवलं आहे. काही भाजप कार्यकर्त्यांना आंदोलन करतेवेळी पोलिसांनी ताब्यात घेतल्याचेही पाहायला मिळाले.

चोर दरोडे सारखं आम्हाला नेलं, घातपाताचा डाव असल्याची शंका, प्रविण दरेकर का भडकले?

राजीनामा तुमच्या बापालाही घ्यावा लागेल, सुधीर मुनगंटीवार कडाडले

‘आम्ही खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभे आहोत’ राऊतांना राहुल गांधींचं पत्र

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.