Chandrakant Patil : मुख्यमंत्रिपद देऊन शिवसेनेचा हिंदुत्वाचा आधार संपविण्याचे कारस्थान, चंद्रकांत पाटलांचा पुन्हा गौप्यस्फोट
शिवसेनेला (Shivsena) मुख्यमंत्रिपदाची खुर्ची देऊन हिंदुत्वाचा आधार (Hindutv) काढून घेण्याचे कारस्थान मास्टरमाईंडने 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच रचून अंमलात आणले. हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या तेव्हा लक्षात आले नाही, असा खळबळजनक गौप्यस्फोट भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी शुक्रवारी केला.
कोल्हापूर : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) एकामागोमाग एक गौप्यस्फोट सध्या करत आहेत. कोल्हापुरात उत्तर कोल्हापूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीने वातावरण तापलं आहे. या प्रचारात चंद्रकांत पाटलांनी पुन्हा मोठा गौप्यस्फोट केला आहे. शिवसेनेला (Shivsena) मुख्यमंत्रिपदाची खुर्ची देऊन हिंदुत्वाचा आधार (Hindutv) काढून घेण्याचे कारस्थान मास्टरमाईंडने 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच रचून अंमलात आणले. हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या तेव्हा लक्षात आले नाही, असा खळबळजनक गौप्यस्फोट भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी शुक्रवारी केला. आता कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने तरी उद्धव ठाकरेंच्या हे कारस्थान ध्यानात येईल, अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली. कोल्हापुरातच त्यांनी तीनवेळा महाविकास आघाडी बनवण्याचा प्रयत्न केला असल्याचा गोप्यस्फोट केला होता त्यावर आता प्रतिक्रिया उमटत आहेत.
राऊतांची पवारांचा माणूस असल्याची कबुली
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाचे उमेदवार सत्यजित कदम यांच्या वचननाम्याचे प्रकाशन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ऐक्यवादी रिपब्लिकनचे नेते दिलीप जगताप यांनी यावेळी भाजपाला पाठिंबा जाहीर केला.चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, शिवसेना खासदार संजय राऊत हे उद्धवजींपेक्षा शरद पवार यांच्या जवळचे आहेत, असे आपण सतत सांगत होतो. आता संजय राऊत यांनी स्वतःच आपण शरद पवारांचा माणूस असल्याची कबुली दिली आहे. अशी जाहीर कबुली देण्यास धाडस लागते, असा टोला त्यांनी राऊतांना लगावला आहे.
मास्टरमाईंडने योजना बनवली
चंद्रकांत पाटील म्हणाले, 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये मास्टरमाईंडने एक योजना बनविली व त्यानुसार भाजपा शिवसेना यांच्या दरम्यान अंतर निर्माण करण्याची जबाबदारी एक एजन्सीला दिली गेली. दोन्ही पक्षांमध्ये संघर्ष होण्यासाठी रोज आगीत तेल ओतण्याचे काम त्यांनी केले. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुखांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली. परंतु, मुख्यमंत्रिपद देऊन शिवसेनेचा हिंदुत्वाचा आधार पूर्णपणे संपविण्याचा मास्टरमाईंडचा कट त्यावेळी उद्धवजींच्या ध्यानात आला नाही. तो आता तरी कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने त्यांच्या ध्यानात यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
सेनेने जिंकलेली जागा दिली
तसेच शिवसेनेने सातत्याने जिंकलेली कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची जागा काँग्रेसला दिली. पण निवडणुकीत हाताला मतदान करताना कोल्हापूरमधील हिंदुत्ववादी शिवसैनिक मतदार एकदा काँग्रेसकडे दिला की नंतर शिवसेना निवडणूक लढवित असताना काँग्रेसकडून परत आणता येणार नाही याची जाणीव मातोश्रीला झाली तर शेवटच्या दोन दिवसात निरोप येईल, असे वाटते, असेही ते म्हणाले.
शरद पवारांच्या घराबाहेरील आंदोलन संशयास्पद; पोलिसांनी चौकशी करावी, नेमकं काय म्हणाले धनंजय मुंडे
‘क्या तुमने कभी किसी से प्यार किया?’ हिंगोलीतील प्रेमवेड्या तरुण शेतकऱ्याचं थेट उद्धव ठाकरेंना पत्र