धक्कादायक, नातेवाईकांची 48 तास बेडसाठी धावाधाव, अखेर बेड मिळाला पण 15 मिनिटात जीव गेला

चंद्रपूर शहरातील केबल ऑपरेटरचा व्हेंटिलेटर बेड न मिळाल्याने मृत्यू झाला Chandrapur Corona patient died

धक्कादायक, नातेवाईकांची 48 तास बेडसाठी धावाधाव, अखेर बेड मिळाला पण 15 मिनिटात जीव गेला
सांकेतिक फोटो
Follow us
| Updated on: Apr 09, 2021 | 6:42 PM

चंद्रपूर: चंद्रपुरात कोरोना उद्रेकामुळे व्हेंटिलेटरयुक्त खाटांची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. शहरातील केबल ऑपरेटरचा बेड न मिळाल्याने मृत्यू झाला. होळीपासून शहरातील खाजगी इस्पितळात हा रुग्ण उपचार घेत होता. ऑक्सिजन पातळी खालावल्याने व्हेंटिलेटरयुक्त बेडची त्याला गरज होती. रुग्णाच्या नातेवाईकांनी 48 तास प्रतीक्षा करूनही बेड मिळत नसल्यानं धावाधाव केली. अखेर बेड मिळाला पण तोपर्यंत संबंधित रुग्णाची प्रकृती खालावली होती. बेड मिळाल्यापासून पंधरा मिनिटातच त्याचा मृत्यू झाला. या घटनेविषयी चौकशी केली असता आरोग्य अधिकार्‍यांनी शहर- जिल्ह्यात पुरेसे बेड व अतिरिक्त खाटांची व्यवस्था होत असल्याची माहिती दिली. (Chandrapur Corona infected patient died due to not get ventilator bed on time and low oxygen level )

ऑक्सिजन पातळी खालावल्यानं मृत्यू

कोरोना उद्रेकाची ही परिस्थिती असताना कोरोनाबाधित रुग्णांना मात्र बेड मिळत नसल्याचे चित्र आहे. चंद्रपूरच्या तुकुम भागातील एका केबल ऑपरेटरला वेळेत बेड न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना पुढे आली आहे. या रुग्णाला होळी नंतर सर्दी-कफाच्या त्रासाने शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.मात्र, ऑक्सिजन पातळी खालावत गेल्याने केलेल्या नमुने तपासणीत तो कोरोनाबाधित आढळून आला. ऑक्सिजन पातळी कमालीची खालावल्याने व्हेंटिलेटरयुक्त बेडची गरज भासू लागली. नातेवाईकांनी यासाठी 48 तास प्रयत्न केले. मात्र त्यात यश आले नाही. सामान्य रुग्णालयातही बेडसाठी आधी होकार व नंतर नकार अशी स्थिती बघायला मिळाली. ज्या क्षणी बेड मिळाला त्यानंतर 15 मिनिटातच ऑक्सिजन पातळी अत्यंत खालावल्याने त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती मृतांच्या नातेवाईकांनी दिली.

आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचा वेगळाचं दावा

दुसरीकडे आरोग्य विभागाचे अधिकारी मात्र शहर- जिल्ह्यात पुरेसे बेड्स उपलब्ध असल्याचे ठासून सांगत आहेत. सध्या जिल्ह्यात ऑक्सिजनयुक्त बेडची संख्या 783, व्हेंटिलेटर युक्त बेडची संख्या 88 तर आयसीयु बेडची संख्या 200 असल्याचे सांगितले जात आहे. यापुढच्या काळात महिला रूग्णालयातील 1000 खाटा रुग्णांसाठी उपलब्ध होणार असून त्याही रुग्णसेवेसाठी वापरल्या जाणार आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांनी दिली. रुग्णांना मात्र बेड्स मिळत नसल्याने मृत्यू झाल्याच्या घटना पुढे येत आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यात मागील 24 तासात 668 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली आहे तर 9 बाधितांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 31 हजार 168 वर पोहोचली आहे. सध्या 3794 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख 91 हजार 853 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या:

Maharashtra Lockdown : महाराष्ट्रात 3 आठवड्यांचा कडक लॉकडाऊन लागणार?

Maharashtra Lockdown : वाढते मृत्यू, लसींचा तुटवडा, मुख्यमंत्र्यांची आठवडाभरातच लॉकडाऊनबाबत दुसरी बैठक

(Chandrapur Corona infected patient died due to not get ventilator bed on time and low oxygen level )

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.