रुग्णालयात फेऱ्या मारुनही बेड मिळाला नाही, चंद्रपुरात रुग्णाचा स्वतःच्या गाडीतच मृत्यू

अखेरपर्यंत प्रवीण दुर्गे यांना कुठेही बेडची मिळाला नाही. शेवटी आपल्या गाडीतच त्यांचा मृत्यू झाला (Chandrapur Corona Patient dies in car)

रुग्णालयात फेऱ्या मारुनही बेड मिळाला नाही, चंद्रपुरात रुग्णाचा स्वतःच्या गाडीतच मृत्यू
Follow us
| Updated on: Apr 19, 2021 | 2:40 PM

चंद्रपूर : रुग्णालयाच्या चकरा घालूनही बेड न मिळाल्याने कोरोनाग्रस्त रुग्णाचा स्वतःच्या गाडीत मृत्यू झाला. उपचार न मिळाल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात बस स्थानकावरच रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच कोरोना स्थितीची भीषणता अधोरेखित करणारी आणखी एक घटना समोर आली आहे. उपचारांअभावी 40 वर्षीय व्यक्तीने कारमध्येच प्राण सोडले. (Chandrapur Corona Patient dies in own car after fails to get bed in hospital)

नातेवाईकांसह गाडीतून रुग्णालयात फेऱ्या

चंद्रपूरमध्ये राहणाऱ्या 40 वर्षीय प्रविण दुर्गे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. दुर्गे हे चंद्रपूर शहरातील नगीनाबाग परिसरात वास्तव्याला होते. प्रकृती बिघडल्यानंतर काल (रविवारी) ते नातेवाईकांसह रुग्णालयात फिरत होते. उपचार आणि बेड मिळावा यासाठी ते अनेक रुग्णालयांमध्ये फेऱ्या मारत होते.

दिवसभर वणवण पण बेड मिळाला नाही

अखेरपर्यंत प्रवीण दुर्गे यांना कुठेही उपचार किंवा बेडची सुविधा मिळाली नाही. शेवटी सोमवारी पहाटे आपल्या अल्टो गाडीतच त्यांचा मृत्यू झाला. दुर्गेंच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी शासकीय कोव्हिड रुग्णालय परिसरातच टाहो फोडला.

लागोपाठ दोन दिवस चंद्रपुरात बेडअभावी मृत्यू

दुसरीकडे,  उपचार न मिळाल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात बस स्थानकावरच रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना कालच घडली होती. ब्रम्हपुरी शहरातील गोविंदा निकेश्वर (50) यांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाची लागण झाल्याचे समजल्यानंतर त्यांनी  उपचारासाठी रुग्णालयात भरती होण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांना जिल्ह्यातील आंभोरा येथून ब्रम्हपुरी येथील कोविड रुग्णालयात आणण्यात आले. मात्र तिथेही बेड शिल्लक नव्हते. वणवण करुनही त्यांना उपचारासाठी बेड मिळाला नाही.

शेवटी बसस्थानकावर प्राण सोडला

दिवसभर चकरा मारुनही गोविंदा निकेश्वर यांना उपचारासाठी कोणत्याही रुग्णालयाने भरती करुन घेतले नाही. बेड शिल्लक नसल्यामुळे त्यांच्यावर उपचार करण्यास नकार देण्यात आला. शेवटी रात्र होत असल्यामुळे निकेश्वर हे ख्रिस्तानंद रुग्णालयासमोर असलेल्या बस स्टॉपवर गेले. तिथे त्यांनी आसरा घेतला. मात्र उपचाराविना त्यांचा पत्नीसमोर स्टॉपवरच मृत्यू झाला.

पुरेशा मनुष्यबळाचा अभाव, औषध आणि ऑक्सिजनचा तुटवडा, बेड उपलब्ध नसल्यामुळे शेकडो कोरोनाग्रस्तांचा उपचाराविना मृत्यू होत आहे. हा प्रकार राज्यात सर्वत्र घडत असल्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातोय. मात्र राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या मतदारसंघातच हा प्रकार घडल्यामुळे राज्य सरकारवर टीका होत आहे.

संबंधित बातम्या :

शेवटच्या श्वासापर्यंत बेडसाठी वणवण, शेवटी बसस्थानकात पत्नीसमोर प्राण सोडला

(Chandrapur Corona Patient dies in own car after fails to get bed in hospital)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.