Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: ऐन कोरोनात जीव धोक्यात घालून काम केलं, त्याची दमडीही नाही, दोन कॅबिनेट मंत्री आक्रोश बघत निघून गेले

ऐन कोरोनाकाळात जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना दमडीसुद्धा न मिळाल्यामुळे हे कर्मचारी आक्रोश करताना दिसत आहेत.  (chandrapur contract labours protest)

Video: ऐन कोरोनात जीव धोक्यात घालून काम केलं, त्याची दमडीही नाही, दोन कॅबिनेट मंत्री आक्रोश बघत निघून गेले
CHANDRAPUR PROTEST
Follow us
| Updated on: Apr 28, 2021 | 10:37 PM

चंद्रपूर : सध्या राज्यात कोरोनाची दुसरी लाट आहे. या लाटेमध्ये वैद्यकीय कर्मचारी जीवाचं रान करुन कोरोनाग्रस्तांवर उपचार तसेच इतर पुरक काम करत आहेत. मात्र, चंद्रपूरमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये या लढ्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कोरोनाच्या पहिल्या लाटेपासूनचे वेतन थकल्याचा प्रकार समोर आला आहे. ऐन कोरोनाकाळात जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना दमडीसुद्धा न मिळाल्यामुळे हे कर्मचारी आक्रोश करताना दिसत आहेत.  वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh) आणि मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) हे चंद्रपूर दौऱ्यावर असताना पत्रकार परिषदेमध्ये या आक्रोशाची दाहकता पाहायला मिळाली. (Chandrapur medical collage contract labours protested in front of minister Amit Deshmukh and Vijay Wadettiwar and asked for overdue wages)

नेमका प्रकार काय ?

चंद्रपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात काही कर्मचारी कंत्राटी पद्धतीने काम करतात. या कर्मचाऱ्यांनी कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून येथे काम केले. मात्र वेतन थकल्यामुळे मागील 77 दिवसांपासून या कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुर आहे. पहिल्या लाटेपासून 560 कर्मचाऱ्यांचे वेतन रखडलेले आहे. आमचे वेतन लवकरात लवकर मिळावे म्हणून हे कर्मचारी आंदोलक डेरा आक्रोश आंदोलन करत आहेत.

रडून रडून दोन मंत्र्यांसमोर व्यथा मांडली

वेतन थकल्यामुळे या कंत्रीटी कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांसमोर आंदोलन सुरु आहे. याच दरम्यान 27 एप्रिल रोजी राज्यातील दोन मंत्री अमित देशमुख आमि विजय वडेट्टीवार हे चंद्रपूर दौऱ्यावर होते. यावेळी ते शासकीय पत्रकार परिषदेत बोलत होते. याच दरम्यान पत्रकार परिषद संपल्यानंतर आंदोलक महिलांनी येऊन त्यांच्या वेतनाबद्दलची व्यथा मांडली. यावेळी बोलताना या महिलांच्या डोळ्यांतून अश्रू निघत होते. महिलांचा वेतनासाठीचा आक्रोश पाहून सर्व सभाग्रह गहिवरला होता.

मंत्र्यांनी काढता पाय घेतला

यावेळी पत्रकार परिषद संपल्यानंतर या कंत्राटी कर्मचारी महिलांनी वेतनाबद्दल आपली व्यथा दोन मंत्री म्हणजेच विजय वडेट्टीवार आणि अमित देशमुख यांच्यापुढे मांडल्या. त्यांचे वेतन देण्याची मागणी करत होत्या.  मागील 77 दिवसांपासून आंदोलन सुरु असल्यामुळे या महिलांच्या डोळ्यांत आश्रू आले होते. मात्र,  या महिलांचे ऐकूण घेण्याऐवजी दोन्ही मंत्र्यांनी काढता पाय घेतला. मदतीचे किंवा वेतन देण्याचे कोणतेही आश्वासन न नेता हे दोन्ही मंत्री सभागृहातून निघून गेले. उलट कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनावर भाष्य करताना सध्याच्या कोविड काळात हे आंदोलन कसे करू शकतात?, असा विचारला अमित देशमुख यांनी विचारला.

पाहा व्हिडीओ :

दरम्यान, दोन्ही मंत्र्यांनी वेतनाबद्दल कोणतेही भाष्य न केल्यामुळे आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. आंदोलकांनी दोन्ही मंत्र्यांचा ताफा अडवून थेट रस्त्यावर आंदोलन केले होते. एकीकडे रुग्णालय कर्मचाऱ्यांना योद्धा म्हणून संबोधत असताना त्यांच्या प्रश्नांविषयी मात्र सरकार असंवेदनशील असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

इतर बातम्या :

केंद्र सरकारवर जबाबदारी ढकलून चालणार नाही; पंकजा मुंडेंनी सुनावलं

कोरोनाचा हाहाकार! राज्यात 985 कोरोनाबाधितांचा मृत्यू, 63,309 नव्या रुग्णांची नोंद

(Chandrapur medical collage contract labours protested in front of minister Amit Deshmukh and Vijay Wadettiwar and asked for overdue wages)

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.