चंद्रपूर : जीव धोक्यात घालून वाघांचे छायाचित्र; ‘त्या’ छायाचित्रकारांवर वनविभागाकडून कारवाईचा इशारा

चंद्रपूर जिल्ह्यातल्या प्रतिबंधित क्षेत्राात (Restricted area) जाऊन काही हौशी छायाचित्रकार (Photographer) वाघाचे (Tiger) फोटो काढतात. असे फोटो काढताना त्यांच्याकडून अनेकदा नियम धाब्यावर बसवले जातात. आता अशा छायाचित्रकारांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा वनविभागाने दिला आहे.

चंद्रपूर : जीव धोक्यात घालून वाघांचे छायाचित्र; 'त्या' छायाचित्रकारांवर वनविभागाकडून कारवाईचा इशारा
जीव धोक्यात घालून वाघाचे छायाचित्र
Follow us
| Updated on: Jan 31, 2022 | 8:41 PM

चंद्रपूर : जिल्ह्यातल्या प्रतिबंधित क्षेत्राात (Restricted area) जाऊन काही हौशी छायाचित्रकार (Photographer) वाघाचे (Tiger) फोटो काढतात. असे फोटो काढताना त्यांच्याकडून अनेकदा नियम धाब्यावर बसवले जातात. वाघापासून अगदी दहा फुटांच्या अंतरावर जाऊन ते फोटो काढतात. याची गंभीर दखल आता वनविभागाच्या वतीने घेण्यात आली आहे. जे छायाचित्रकार फोटो काढताना नियमांचे उल्लंघन करतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे वनविभागाने सांगितले आहे. यासंदर्भातील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये वाघाचे फोटो काढताना नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातून बाहेर पडलेले वाघ आता जिल्ह्याच्या सर्वच क्षेत्रात संचार करत आहेत. जिल्ह्यात मुक्तसंचार करणाऱ्या या वाघांचे छायाचित्र तसेच व्हिडीओ शुट करण्यासाठी अनेकांकडून जीव धोक्यात घातला जात आहे. 1 जून 2021 रोजी ताडोबाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर वाघाचा रस्ता अडवून अशाच रीतीने चित्रीकरण करण्यात आले होते. याप्रकरणी संबंधित छायाचित्रकारांवर कारवाई करण्यात आली होती.

जिल्ह्यातील अनेक भागात वाघांचा मुक्तसंचार

जिल्ह्यातील अनेक भागात वाघाचा मुक्तसंचार असतो मात्र स्थानिक नागरिकांना वाघाचे वर्तन माहित असल्याने स्थानिक सहसा या वाघांच्या वाट्याला जात नाहीत. मात्र जिल्ह्याच्या बाहेरून येणारे हौशी पर्यटक आणि छायाचित्रकार या वाघांचे छायाचित्र काढण्याचा प्रयत्न करतात. वाघाच्या अगदी जवळ जाऊन छायाचित्र काढले जाते. यामुळे वन्यप्राणी आणि मानव यांच्यामधील संघर्ष अधिक तिव्र झाल्याचे पहायला मिळत आहे.

…तर होणार कठोर कारवाई

दरम्यान जे छायाचित्रकार अशा पद्धतीने वाघाचे छायाचित्र काढतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा वनविभागाच्या वतीने देण्यात आला आहे. तसेच अशापद्धतीने छायाचित्र काढू नका असे आवाहन देखील वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे. अशा पद्धतीने छायाचित्र काढल्यास मनुष्य आणि वनजीव यांच्यातील संर्घष तीव्र होत आहे. यातून अनेकवेळा मनुष्यावर हल्ले झाल्याच्या घटना देखील घडत आहेत.

संबंधित बातम्या

Student Protest : विद्यार्थी आंदोलनामागे षडयंत्र, वळसे-पाटलांचा आरोप, तर आणखी एक व्हिडिओ पोलिसांच्या हाती

Goa Assembly Elections 2022 : पणजीतली लढाई माफिया विरुद्ध कार्यकर्ता, गोव्यानं पणजीचा आदर्श घ्यावा-संजय राऊत

ज्यानं अ‍ॅसिड हल्ला केला, त्या पतीला सोडवण्यासाठी चक्क पत्नीची याचना! म्हणते ‘सोडा त्याला, नवराच तर आहे’

Non Stop LIVE Update
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.