AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

थोरात-पटोले वाद विकोपाला असतांना ‘या’ नेत्याचं मोठं विधान, बाळासाहेब थोरात यांना दिली ऑफर

कॉंग्रेसमधील जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. याच काळात थोरात यांना एका मोठ्या राजकीय पक्षाने ऑफर दिली आहे.

थोरात-पटोले वाद विकोपाला असतांना 'या' नेत्याचं मोठं विधान, बाळासाहेब थोरात यांना दिली ऑफर
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Feb 07, 2023 | 2:13 PM

मुंबई : नुकताच कॉंग्रेसचे विधीमंडळ पक्षाचे नेते पदाचा राजीनामा बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी दिल्यानंतर कॉंग्रेसमधील वाद विकोपाला गेल्याचं समोर आले आहे. कॉंग्रेसमध्ये (Congress) दोन गट पडल्याचे चित्र यानिमित्ताने समोर आले आहे. सत्यजित तांबे ( (Satyajit Tambe) यांच्या उमेदवारीवरुन ज्या घडामोडी झाल्या त्यावरून संपूर्ण राज्याचे लक्ष बाळासाहेब थोरात यांच्या भूमिकेकडे लागून होते. त्यामध्ये बाळासाहेब थोरात यांनी सत्यजित तांबे यांच्याच बाजूने भूमिका मांडत कॉंग्रेसच्या हायकमांडकडे नाराजी व्यक्त केल्याचे समोर आले होते. त्यानंतर विधीमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे (BJP) पक्षनेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी मोठं विधान केले आहे.

कॉंग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी विधीमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्यानंतर कॉंग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. त्यावरून पटोले विरुद्ध थोरात हा वाद सुरू असल्याचे समोर आले आहे.

बाळासाहेब थोरात यांच्याकडील प्रदेशाध्यक्ष पद काढून नाना पटोले यांना देण्यात आल्यानंतर कॉंग्रेसमधील एक गट नाराज झाला होता, त्यात सत्यजित तांबे यांच्याबद्दल उमेदवारीच्या दरम्यान एबी फॉर्मचा गोंधळ झाल्याने आणखीच धार मिळाली आहे.

हे सुद्धा वाचा

मात्र, याच काळात सत्यजित तांबे यांना भाजपने दिलेला पाठिंबा आणि त्यानंतर झालेले राजकारण बघता बाळासाहेब थोरात यांची भूमिका महत्वाची मानली जात होती. त्यामध्ये बाळासाहेब थोरात यांनी मोठी भूमिका घेतली आहे.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करत बाळासाहेब थोरात यांनी कॉंग्रेसच्या हायकमांडकडे नाराजी व्यक्त केली होती, त्यामुळे बाळासाहेब थोरात यांनी नाना पटोले यांच्याबाबत पक्षाकडे नाराजी व्यक्त केली होती.

याच दरम्यान बाळासाहेब थोरात यांच्यासह सत्यजित तांबे यांच्या बद्दल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ऑफर देऊन टाकली आहे. कुणाला आमच्या पक्षात यायचे असेल तर आम्ही घेऊ म्हंटले आहे.

याशिवाय सत्यजित तांबे यांच्यासाठी आमचे दरवाजे खुले आहेत असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हंटलं आहे. त्यामध्ये बाळासाहेब थोरात यांचे कॉंग्रेसमधील जे स्थान आहे, त्यापेक्षा आमच्या पक्षात नककीचे मोठे स्थान राहील याची काळजी घेऊ असेही बावनकुळे यांनी म्हंटले आहे.

कॉंग्रेसमधील वाद विकोपाला गेलेला असतांना बावनकुळे यांनी दिलेली प्रतिक्रिया चर्चेचा विषय ठरत आहे. त्यावर थोरात आणि तांबे यांना दिलेली ऑफर बघता येत्या काळात मोठ्या राजकीय घडामोडी घडणार असल्याची चर्चा होऊ लागली आहे.

भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बाळसाहेब थोरात यांच्यासह सत्यजित तांबे यांना दिलेली ऑफर ते स्वीकारतात का? की फक्त राजकीय चर्चाच होणार याकडे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!
पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!.
5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला
5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला.
टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री
टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री.
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं.
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी.
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले.
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?.
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय.
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर.
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?.