मुस्लिम मतं कुणाला हवीय? भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचा रोख कुणावर ? काय म्हणाले बावनकुळे…

पुण्यातील पोटनिवडणुकीवरुन राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू आहे. याच दरम्यान मुस्लिम मतं मिळवण्याच्या मुद्द्यावरून चांगलंच राजकरण रंगल्याचे पाहायला मिळत आहे.

मुस्लिम मतं कुणाला हवीय? भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचा रोख कुणावर ? काय म्हणाले बावनकुळे...
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Feb 24, 2023 | 1:55 PM

योगेश बोरसे, टीव्ही 9 मराठी, पुणे : पुण्यातील पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर अखेरच्या टप्प्यात प्रचार सुरू असतांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ( Chandrashekhar Bawankule ) यांनी शरद पवार ( Sharad Pawar )  यांच्यासहित उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. याशिवाय चंद्रशेखर बावनकुळे यांनी हेमंत रासने यांच्या विजयाचा दावा करत असतांना रासने यांच्या विजयाची कारणेही सांगून टाकली आहे. मात्र, चंद्रशेखर बावनकुळे यांनी हल्लाबोल करत असतांना मुस्लिमांच्या मतावर भाष्य करत शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

कसब्याची निवडणूक लढत असतांना आम्ही विकासावर निवडणूक लढत आहे. पण आमच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली जाते. जी टीका आम्ही बोलू शकत नाही त्या भाषेत आमच्यावर टीका केली जात असल्याचा आरोप भाजपने केला आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधत असतांना महायुतीचे उमेदवार असलेले हेमंत रासने हे शंभर टक्के निवडून येईल असा दावा करत मुक्ता टिळक आणि गिरीश बापट यांनी कामं केली असल्याचा दावा बावनकुळे यांनी केला आहे.

हे सुद्धा वाचा

शरद पवारांना फक्त मुस्लिमांची मतं पाहिजेत का? शरद पवारांच्या उपस्थितीत त्यांचा एक नेता हिंदू विरोधी भाषण करतो, शरद पवार त्याला थांबवत नाही, हे चुकीचे आहे, पवारांनी भाषण थांबवलं पाहिजे होते असं बावनकुळे यांनी म्हणलंय.

याशिवाय पुढे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले उद्धव ठाकरे यांच्या पायाखालची वाळू सरकली असल्यामुळे आणि राहिलेल्या लोकांना थांबवून ठेवण्यासाठी उद्धव ठाकरे मध्यावधीची वक्तव्य करतायत असाही पलटवार बावनकुळे यांनी केला आहे.

तर कसबा हा गिरीश बापटांचा आहे, मुक्ता टिळक यांनी कसब्यात मोठी कामं केली आहेत, त्यानंतर आता हेमंत रासने या मतदारसंघात विकासकामं करणार, कसब्यात आमचा 100 टक्के विजय आहे असल्याचा दावा बावनकुळे यांनी केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून चंद्रशेखर बावनकुळे हे पुण्यात तळ ठोकून आहे. बावनकुळे यांच्यावर भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी असल्याने दोन्ही जागांवर विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतांना महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल करत आहे.

प्रचाराचा आज शेवटचा दिवस असल्याने पुण्यातील कसबा आणि चिंचवड मतदार संघात अनेक दिग्गज नेत्यांचा दौरा आहे. दोन्ही निवडणुका या प्रतिष्ठेच्या झाल्या आहेत. त्यामुळे या निवडणुकीतील विजय महत्वाचा असणार असल्याने या पोटनिवडणूकीकडे उभ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.