अमळनेरात परिवर्तनाची नांदी; नागरिकांनी वेश्या व्यवसायाला विरोध करणारे घराबाहेर लावले फलक!
वेश्याव्यसायाच्या नावाने कुप्रसिद्ध असलेल्या अमळनेरात एका कुटुंबाने समाज प्रबोधनाला सकारात्मक प्रतिसाद देत आपल्या घराबाहेर 'येथे वेश्या व्यवसाय होत नाही, कुणीविचारणा केल्यास पोलिसांच्या स्वाधीन केले जाईल,' असा फलकच लावल्याने परिवर्तनाची नांदी दिसून आली आहे.
नाशिकः संत सखाराम महाराज, सानेगुरुजी, श्रीमंत प्रताप शेठ यांच्या नावाने सुप्रसिद्ध असलेले मात्र वेश्या व्यसायाच्या नावाने कुप्रसिद्ध असलेल्या अमळनेरात एका कुटुंबाने समाज प्रबोधनाला सकारात्मक प्रतिसाद देत आपल्या घराबाहेर ‘येथे वेश्या व्यवसाय होत नाही, कुणीविचारणा केल्यास पोलिसांच्या स्वाधीन केले जाईल,’ असा फलकच लावल्याने परिवर्तनाची नांदी दिसून आली आहे. गावकऱ्यांच्या या विरोधाला प्रतिसाद देत शासनाने नोटिफिकेशन जारी करून हे क्षेत्र प्रतिबंधक क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे.
शहरात अनेक वर्षांपासून वेश्याव्यवसाय जोरात सुरू होता. अनेकदा याविरोधात आंदोलने झाली. उच्च न्यायालयात तक्रारी गेल्या. अनेकदा आंबट शौकीन सामान्य नागरिकांच्या घरात घुसत. त्यामुळे त्यांची बदनामी होत असे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील मुलींचे लग्न होत नसत. या प्रकाराला कंटाळून कुदरत अली यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून वेश्या व्यवसाय बंदीची मागणी केली होती. न्यायालयाने या भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आदेश दिले होते. मात्र, तत्कालीन पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांच्या काळात सीसीटीव्ही कॅमेरे ही खराब करण्यात आले. नियोजन नसल्याने पुन्हा व्यवसाय जोरात सुरू झाला. म्हणून कुदरत अली यांनी पुन्हा न्यायालयात तक्रार केली. पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी दोन मालकीणींवर कारवाई करून त्यांना अटक केली, तर आठ पीडित महिलांना महिला सुधारगृहात पाठवण्यात आले. त्यांनतर पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, अॅड शकील काझी यांनी दसऱ्याच्या दिवशी त्या कुटुंबांचे प्रबोधन करून वेश्याव्यवसायपासून परावृत्त होण्याची विनंती करत कायदेशीर कारवाईची तंबीही दिली. शासनाने या परिसरातील दोन गल्ल्या प्रतिबंधक क्षेत्र म्हणून जाहीर केल्या असून, पोलिसांना विशेष अधिकार दिले आहेत. वेश्या व्यवसाय झाल्यास घरे सील केले जातील, असा इशारा दिला आहे. मात्र, काही कुटुंब स्वतःहून यापासून दूर जात आहेत. त्यांचे कौतुक होत आहे.
अमळनेरमध्ये अनेक कुटुंबे वेश्या व्यवसायात होती. त्यांचे प्रबोधन करण्यात आले आहे. दोन गल्ल्या प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केल्या आहेत. वेश्या व्यवसाय केल्यास घरे सील केले जातील, असा इशारा दिला आहे. शिवाय पोलिसांना विशेष अधिकार दिले आहेत. – जयपाल हिरे, पोलीस निरीक्षक, अमळनेर
आम्हालाही सन्मानाने जगावेसे वाटते. आता कोणताही गैर व्यवसाय चालणार नाही. मी संगणक दुरुस्ती व व्यापार करतो. माझ्या कुटुंबाला यापासून दूर न्यायचे आहे. आता आम्हालाही संरक्षण मिळावे. – अशपाक शेख मुशिरोद्दीन, नागरिक
इतर बातम्याः
अमृत महोत्सवानिमित्त भुजबळांनी सोडला नेत्रदानाचा संकल्प; 74 लाख नागरिकांना मोहिमेत सहभागी करून घेणार
फडणवीस ‘क्लीन मास्टर’, भुजबळांची सडकून टीका; ठाकरे-पवारांसारखेच मुख्यमंत्री लक्षात राहतात…!
दादरा नगर हवेलीत शिवसेनेचा आवाज घुमणार? डेलकरांच्या प्रचारासाठी ठाकरे भाजपच्या गडात शड्डू ठोकण्याच्या तयारीत https://t.co/YNdSCWdmDd @rautsanjay61 @OfficeofUT @ShivSena @BJP4Maharashtra @BJP4India #DadaraNagarHaweli #Shivsena #KalabenDelkar #SanjayRaut #UddhavThackeray
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 17, 2021