‘अल्लाचा प्रकोप होईल’ अशी भीती दाखवत 15 लाखांची फसवणूक, वसईत 2 भामटे गजाआड

वसईत एका भोंदुबाबाने अल्लाचा प्रकोप होईल, अशी भीती दाखवून तब्बल 15 लाख 59 हजार 550 रुपयांना गंडा घातलाय.

'अल्लाचा प्रकोप होईल' अशी भीती दाखवत 15 लाखांची फसवणूक, वसईत 2 भामटे गजाआड
Follow us
| Updated on: Feb 10, 2021 | 6:46 PM

वसई : नागरिकांच्या श्रद्धेचा गैरउपयोग करत त्यांची फसवणूक करण्याच्या अनेक घटना घडतात. हेच लक्षात घेऊन आता जादुटोणा विरोधी कायदा अस्तित्वात आला. मात्र, त्यानंतर या फसवणुकीच्या घटना घडताना दिसत आहेत. वसईत असाच एक प्रकार समोर आलाय. या ठिकाणी एका भोंदुबाबाने अल्लाचा प्रकोप होईल, अशी भीती दाखवून तब्बल 15 लाख 59 हजार 550 रुपयांना गंडा घातलाय. त्यामुळे जादुटोणा विरोधी कायदा अधिक कठोर होण्याची आणि त्यांची कठोर अंमलबजावणी होण्याची गरज व्यक्त केली जात आहे (Cheating of a person for 15 lakh on the name of god superstition in Vasai).

श्रद्धेच्या नावाखील फसवणूक होऊ नये यासाठी कडक कायदे येत आहेत. अंधश्रद्धेला बळी पडू नये यासाठी काही प्रमाणात जनजागृतीही होते. मात्र, यानंतरही समाजात आजही अनेक जण भोंदुगिरीला बळी पडत असल्याचं वास्तव चित्र वसईत उघड झालंय. एका भोंदुबाबाने अल्लाचा प्रकोप होईल, अशी भीती दाखवून एकाची चक्क 15 लाख 59 हजार 550 रुपयाला फसवणूक केली. याबाबत 2 जणां विरोधात वसई पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जादूटोणा अधिनियम कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. यात संगनमत करून स्वतःच्या फायद्यासाठी फसवणूक केली असल्याची कलमं आहेत. या प्रकरणी दोन्ही आरोपींना अटक करण्यात आलीय.

मकसूद मोहम्मद हुसेन अन्सारी आणि असिफ इब्राहिम मेमन असं अटक करण्यात आलेल्या दोन भामट्यांची नावं आहेत. हे दोघेही वसईच्या पापडी परिसरातील राहणारे आहेत. वसईतील इलेक्ट्रिक व प्लंबिंगचं काम करणारे 49 वर्षीय व्यक्तीच्या मुलावर कोणत्या तरी प्रकारचा जादूटोणा करण्याची धमकी देण्यात आली होती. घरातील पैसे व सोन्या चांदीचे दागिने आणून दे, अन्यथा तुझ्यावर अल्लाचा प्रकोप होईल, अशी भीतीही घालण्यात आली. तसेच या प्रकोपापासून वाचण्यासाठी 15 लाख 59 हजार 550 रुपये किमतीचे 29.6 तोळे सोने, 1 लाख 50 हजार रुपये रोख रक्कम घेण्यात आली.

आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर पीडित कुटुंबियांनी तात्काळ वसई पोलीस ठाणे गाठून आरोपी विरोधात भादंवि कलम 420, 34 सह महाराष्ट्र जादूटोणा अधिनियम कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल केला. आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या आरोपीने आणखी किती जणांनी फसवणूक केली आहे याचा तपास आता पोलीस करत आहेत.

हेही वाचा :

पुण्यात ग्रामपंचायत सदस्यांची नावे लिंबावर, सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी जादूटोणा झाल्याचा दावा

म्हशीवर करणी केल्याचा समज, बीडमध्ये चिमुकल्याची हत्या, भावकीतील दाम्पत्य अटकेत

Eknath Shinde| अंधश्रद्धेला बळी पडू नका, समाजाला सावध करा; अघोरी घटनांवर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

व्हिडीओ पाहा :

Cheating of a person for 15 lakh on the name of god superstition in Vasai

'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.