मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यावर आले की नाही?, असे सोप्या मार्गाने चेक करा
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत लाभार्थ्यांची संख्या एक कोटी साठ लाख झाली आहे. ही संख्या दोन कोटीपर्यंत नेण्याचे टार्गेट असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच म्हटले आहे.
मध्य प्रदेशात भाजपाला लाडली बहेना या योजनेने तारले होते. त्यामुळे महायुतीने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात लागू केली आहे.या योजनेचा ग्रामीण भागातील महिलांना खूपच फायदा होत आहे. 14 ऑगस्ट पासून या योजनेचे पैसे देखील मिळायला सुरुवात झाली आहे.सध्या जुलै आणि ऑगस्टचे प्रत्येकी 1500 असे तीन हजार रुपये मिळत आहेत. या सप्टेंबर महिन्यात काही खातेधारकांना पैसे मिळण्यास सुरुवात होणार आहे. दरम्यान, बऱ्याच महिलांनी उशीरा योजनेत प्रवेश केल्याने त्यांच्या बॅंकेत पैसे आलेले नाहीत. पैसे आले की नाही हे कसे तपासायचे ? असा जर तुमच्या समोर प्रश्न असेल तर ही माहीती तुमच्यासाठी आहे.
सध्या राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) सगळीकडे चर्चा आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना 14 ऑगस्ट 2024 पासून लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे. सध्या काही महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3000 रुपये मिळत आहेत. आता सप्टेंबर महिन्यातही काही महिलांना पैसे मिळण्यास सुरुवात होणार आहे. दरम्यान, अनेक महिलांना बँक खात्यात पैसे आले की नाही, हे कसे चेक करावे? असा प्रश्न पडला आहे. याच पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळालेला आहे की नाही, हे कसे तपासावे हे समजून घेऊ या…
सध्या कुणाला पैसे मिळत आहेत?
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिना 1500 रुपये मिळतात. जुलै महिन्यापासून या योजनेचे हप्ते मिळायला सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात 14 ऑगस्टपासून महिलांना जुलै आणि ऑगस्ट असे राखी पोर्णिमेच्या निमित्ताने सरकारने एकत्र तीन हजार रुपयांची भेट दिली.सध्या या योजनेच्या निधी वितरणाचा दुसरा टप्पा सुरु झाला आहे. या टप्प्यात काही महिलांच्या बॅंक खात्यात पैसे जमा झाले आहेत.दुसऱ्या टप्प्यात तीन हजार रुपये एकत्र जुलै आणि ऑगस्टचे पैसे देण्यात आले आहेत.आता योजनेचा तिसरा टप्पा चालू होणार आहे
कोणाला किती रुपयांचा हप्ता मिळणार
तिसऱ्या टप्प्यात पात्र महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये मिळालेले आहेत. या महिलांना सप्टेंबर महिन्यात 1500 रुपये मिळणार आहेत. ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्टचा हप्ता देखील मिळालेला नाही.त्या महिलांना आता सप्टेंबर महिन्यात एकूण 4500 रुपये एकत्र मिळती असे म्हटले जात आहे.म्हणजे आतापर्यंत एकही हप्ता न मिळालेल्या पात्र महिलांना सप्टेंबर महिन्यात एकत्र 4500 रुपये मिळतील. मात्र त्यासाठी बॅंकेचा खाते क्रमांक आणि आधार नंबरला जोडलेला असायला हवा. आधार केंद्रावर जाऊन आपण आपला सध्या सुरु असलेला मोबाईल क्रमांक आधारशी जोडलेला असायला हवा.
बॅंक खात्यात पैसे आल्याचे असे चेक करावे?
लाडकी बहीण योजनेचे हप्ते मिळायला सुरुवात झाली आहे. योजनेत सामील महिलांच्या बँक खात्यावर हे पैसे पाठवले जातात. आपल्या बॅंक खात्यावर योजनेचे पैसे पडले की नाही हे तु्म्ही या पद्धतीने पैसे आले की नाही, हे तपासावे
1) तुमच्या बँकेत जाऊन काऊंटरवर चौकशी करु शकता, तसेच कस्टमर केअरला कॉल करून तुमच्या खात्यावर जमा झालेली रक्कम विचारू शकता.
2) तुम्ही जर ऑनलाईन बँकिंग सेवा घेतली असेल तर बँकेच्या अॅपच्याद्वारे बँक स्टेटमेंट डाऊनलोड करून तुमच्या बँक खात्यावर पैसे जमा झाले आहेत की नाही? हे तपासू शकता.
3) तुमच्या बँक खात्यावर पैसे जमा झाले तर तुमचा मोबाईल नंबर जर आधारकार्ड आणि बॅंक खात्याशी जोडलेला असेल तर तुम्हाला बॅंकेचा संदेश येईल. हा संदेश आलेला आहे का? ते तुमच्या मोबाईलवर चेक करा
4) तुम्ही ऑनलाईन बँकिंग सेवा घेतली नसेल तर प्रत्यक्ष बँकेत जाऊनच तुम्हाला खात्यावर पैसे जमा झालेले आहेत की नाही, हे तपासावे लागेल