“सर्वच समाजाचे उमेदवार माझ्या विरोधात आहेत. त्यामुळे एकट्या मराठा समाजाला टार्गेट करण्यात काही अर्थ नाही. माझ्या सर्व विकास कामांमध्ये मराठा, दलित, आदिवासी, ओबीसी सर्व समाज सोबत आहेत. केलेल्या विकासकामांमुळे मला खात्री आहे. सर्वच जाती-धर्माचे लोक मला मतदान करतील. त्यापुढे जावून सर्व पक्षाचे लोक देखील छगन भुजबळ म्हणून मला मतदान करतात. बंडखोरी हा निवडणुकीचा एक भाग आहे. जिल्हा परिषद, नगरपालिका यासह सर्वच निवडणुकीदेखील बंडखोरी होत असते. निवडणुकीचाच हा एक भाग आहे”, असं मंत्री छगन भुजबळ म्हणत होते. ते येवला येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. तसेच “प्रत्येक मतदारसंघात महायुती, महाविकास आघाडीत बंडखोरी आहे. सरासरी 30 ते 35 उमेदवार रिंगणात आहेत. उद्या 4 वाजता खरे चित्र स्पष्ट होईल. त्यानंतर खऱ्या अर्थाने निवडणुकीला सुरुवात होईल”, असंदेखील मनोज जरांगे पाटील यावेळी म्हणाले.
“सगळ्यांना माझ्या शुभेच्छा! निवडणुकीसाठी सर्वच जण भेटत असतात. त्यांना वाटते भेटल्याने आपल्याला फायदा होईल. पण आता पूर्वीसारखी कोणाची मक्तेदारी राहिली नाही. आता एका घरात चार वेगवेगळ्या विचाराचे, पक्षाचे लोक काम करत असतात. मतदार हे वैचारिक झाले आहेत. विचारधारा ही पक्षाचे स्तरावर असते तिथे सर्व गोष्टी तपासल्या जातात. याचा विचार करून लोक योग्य ठिकाणी मतदान करतात. मतदार सुज्ञ झाला आहे. इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल माध्यमे यामुळे मतदार सुज्ञ झाले आहेत. त्यांना सर्व कळतं मत कोणाला दिले पाहिजे”, असं छगन भुजबळ म्हणाले.
“सर्वच मतदारसंघात सरासरी 30 उमेदवार आहेत. उद्या माघारीनंतर खरे चित्र स्पष्ट होईल. महायुती, महविकास आघाडी आणि सर्वच पक्ष बंडोबांना थंड करण्याचे प्रयत्न करतील. बंडखोरी हा प्रत्येक निवडणुकीतील एक महत्वाचा भाग आहे”, असं छगन भुजबळ म्हणाले.
“मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांना भेटल्याने फायदा होईल, असे अनेकांना वाटत असेल. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. मात्र आता कोणाची मक्तेदारी राहिलेली नाही. मतदार वैचारिक आणि सुज्ञ झाले आहेत. सर्व गोष्टी तपासूनच मतदान करतात”, असा टोलाही भुजबळ यांनी शिवसेना आमदार सुहास कांदे आणि मराठा नेते मनोज जरांगे पाटील भेटीवर लगावला.